पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाई आणि म्हशींचे पालन केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे पशुपालन व्यवसायाला महत्त्व आहे. बरेच शेतकरी बंधू त्यांच्या शेडमध्ये संकरित गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर करताना सध्या दिसतात. परंतु जर आपण गाईंच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा आणि म्हशींच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा यांचा जर एकंदरीत कॅल्क्युलेशन केले तर म्हशीपासून मिळणारा आर्थिक नफा जास्त असतो. याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये एक म्हैस पाळल्या नंतर तिच्यापासून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचे एकंदरीत आकडेवारीवरून समजून घेऊ या की म्हैस पालन कसे फायद्याचे ठरते.
म्हैस पालनाचे गणित
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक म्हैस एका दिवसाला किती खाद्य खाते व दूध किती देते याच्या प्रमाणावरून आपण म्हैस पालन फायद्याची की तोट्याचे हे समजू शकतो. त्यामुळे आपण एक साधारण आकडेवारी बघूया. जर आपण म्हशीचा विचार केला तर एक म्हैस दिवसाला 15 ते 20 किलो हिरवा चारा खाते. साधारणपणे एक किलो हिरवा चारा तीन रुपये प्रति किलो पकडला तरी 20 किलो हिरवा चाऱ्याचा खर्च 60 रुपये होतो. तसेच दहा किलो गहू चा भुसा किंवा तांदळाचा भुसा खाते.
आजच्या कालावधीमध्ये जवळपास गव्हाचा भुसा चारशे रुपये क्विंटल या दराने विकला जातो. म्हणजेच चार रुपये प्रति किलो गव्हाचा भुसा पकडला तर दहा किलोचे 40 रुपये होतात. तसेच तीन किलो गहू, बाजरी किंवा इतर धान्य देखील खाते. आपण यामध्ये गव्हाचा हिशोब पकडला तर 22 रुपये प्रति किलो दर आहे. तीन किलो गहू दिवसभरात खाल्ला तर त्याचे 22×3 म्हणजे 66 रुपयाचा ग्रीन खाते. तसेच आपण ऑइल केक म्हणजेच ढेप पकडली तर ती दोन किलो खाते.
ढेपचा विचार केला तर साधारणपणे 30 रुपये किलो दर पकडला तर या हिशोबाने दोन किलोचे होतात साठ रुपये. जर आपण म्हशीच्या दुधाचा विचार केला तर साधारणपणे दहा लिटर दूध देणारी म्हैस एक लाख रुपये पर्यंत मिळते. जर तुम्ही हे एक लाख रुपये बँकेतुन लोन घेऊन किंवा किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतले तर तुम्हाला चार टक्क्यांचे व्याज पडते. तुम्ही जमीन तारण ठेवून बँकेकडून लोन घेतलं तर दहा टक्के व्याजदराने हे कर्ज मिळते.
जर तुम्ही सावकाराकडून कर्ज घेतले तर ते तुम्हाला 12 टक्के व्याजदराने मिळते. म्हणजेच या हिशोबाने जर आपण पकडलं तर एक लाख रुपयाचे एका वर्षाचे व्याज हे 12,000 रुपये होते. एक महिन्याचे हजार रुपये आणि एका दिवसाचे 33.33 रुपये होते. त्यामुळे म्हैस घेण्यासाठी लागलेल्या एक लाख रुपयाचे व्याज देखील आपण यामध्ये पकडूया. हा सगळा खर्च जर पकडला तर एका दिवसाचा एका म्हशीचा खर्च हा 279 रुपये होतो.
यामध्ये जे आपण हिरवा चारा, गव्हाचा पेंडा तसेच धान्य, ढेप आणि एक म्हैस घेण्यासाठी काढलेली कर्जाचे एका दिवसाचे व्याज असे सगळे पकडून एका म्हशीचा खर्च हा 279 रुपये होतो. जर आपण म्हशीचे दूध देण्याचे प्रमाण पकडले तर कमीत कमी एक म्हैस दिवसाला दहा लिटर दूध देते. जर आपण म्हशीच्या दुधाचा रेट पाहिला तर तो 80 ते 95 रुपये प्रति लिटर पर्यंत शहरात आहे. तर आपण एक लिटर दुधाचा रेट 80 रुपये पकडला तरी देखील दहा लिटर दुधाचे एका दिवसाला आठशे रुपये होतात.
या आठशे रुपये मधून एका म्हशीचा दिवसाचा खर्च जो आपण मघाशी पाहिला तो 279 रुपये वजा केला तरी 521 रुपये प्रत्येक दिवसाला आपल्याला निव्वळ आर्थिक नफा मिळतो. यामध्ये बऱ्याचदा म्हैस एका वर्षात 9 ते दहा महिनेच दूध देते. परंतु एका म्हैस नऊ महिने जरी दूध दिले तरी नऊ महिन्याचे 275 दिवस होतात एवढे दिवस जरी दूध दिले तरी एका दिवसाचे 521×275= एक लाख 43 हजार 275 रुपयांचे दूध म्हशीने दिलेले असते. कितीही कसाही खर्च पकडला तरी म्हैस एका वेतामध्ये 94 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न देऊ शकते.