भारतामध्ये अनेक असे उद्योग समूह आहेत किंवा व्यवसाय आहेत ज्यांची सुरुवात अगदी छोट्याशा रोपटापासून झाली आणि आज त्यांचे रूपांतर भल्यामोठ्या अशा वटवृक्षात झालेले आहे. साहजिकच या मध्यंतरीचा कालावधी हा अखंड संघर्षाचा आणि कष्टाचा असतो हे तितकेच खरे असते. कधी कधी असे व्यक्ती समाजात असतात की जी गोष्ट काहींना जमत नाही ती अगदी लिलया असे व्यक्ती सक्सेस करतात.
जर आपण भारतातील अनेक ब्रँड किंवा अनेक उद्योग समूह यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांची सुरुवात आणि यशापर्यंतचा प्रवास हा अनेक प्रकारच्या असंख्य अडचणी आणि खाचखळग्यानी भरलेला आहे. फरार उद्योजक विजय मल्ल्या याचा विचार केला तर भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपये घेऊन काही कालावधी पूर्वी मोठ्या उद्योगपतींमध्ये गणना होत असलेला विजय मल्ल्या सध्या फरार आहे. परंतु याच विजय मल्ल्याची एक बुडत असलेली कंपनी विकत घेऊन दोन भावांनी त्या कंपनीचा व्यवहार 56 हजार कोटींच्या घरात नेला आहे. त्यांचीच यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.
धिंग्रा बंधूनी केली कमाल
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पंजाब राज्यातील एका शहरांमध्ये एक छोटेसे दुकान चालवणाऱ्या कुलदीपसिंग धिंग्रा आणि गुरुबचनसिंग धिंग्रा यांनी मोठा धोका पत्करत विजय मल्ल्याची जी काही बुडीत किंवा बुडणारी कंपनी होती त्यामध्ये पैसे गुंतवले. वास्तविक पाहता बुडत असलेल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणे यामध्ये खूप मोठी जोखीम होती व ही जोखीम या बंधूंनी पत्करली. विजय मल्ल्याकडून ही कंपनी त्यांनी विकत घेतली.
पंजाब राज्यांमध्ये राहणारे धिंग्रा बंधूंचे कुटुंब हे अनेक वर्षापासून पंजाब मध्येच राहत असून अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी अमृतसरमध्ये दुकान सुरू केले होते. त्यानंतर या दोघही भावांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले व कुटुंबाचा जो काही वडिलोपार्जित व्यवसाय होता त्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केले. परंतु शिकलेले असल्यामुळे या दोघेही भावांनी त्यांचे दुकान देखील आधुनिक पद्धतीने सुरू केले व शहरांमध्ये खूप प्रसिद्ध केले.
असाच दुकानावर काम करत असताना त्यांना एके दिवशी कळले की विजय मल्ल्याचा जो काही युबी समूह आहे त्या समूहाची पेंट कंपनी विक्री आहे व लागलीच एका मित्राच्या मध्यस्थीने ते विजय मल्ल्याला भेटायला गेले व एकाच बैठकीमध्ये त्यांनी ही कंपनी विकत घेण्याचा करार केला. जेव्हा या दोन्ही भावांनी विजय मल्ल्याकडून ही कंपनी घेतली तेव्हा ती कंपनी देशातील सर्वात लहान पेंट उत्पादन करणारी कंपनी होती.
आता विचार करा की आता बुडणारी कंपनी आहे व त्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. कंपनी उभी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणे गरजेचेच होते. त्यानंतर त्यांनी ही कंपनी सुरू केली व या कंपनीला नाव देण्यात आले बर्जर पेंट. 1970 च्या दशकामध्ये बर्जर पेंटची उलाढाल दहा लाख रुपये होती व ही कंपनी उभी करण्यासाठी दोघेही भावानी प्रचंड प्रमाणात कष्ट घेतले व अवघ्या दहाच वर्षात बर्जर पेंट्स ही कंपनी सोवियत युनियन मधील सर्वात मोठी पेंट निर्यात कंपनी बनली.
या यशानंतर मात्र दोघेही भावांनी मागे वळून पाहिले नाही. जर आपण आज बर्जर पेंट या कंपनीचा विचार केला तर ही भारतातील दुसरी सर्वात मोठी पेंट निर्माण करणारी कंपनी आहे. आज बर्जर पेंटचे मूल्यांकन पाहिले तर ते 56 हजार कोटींच्या घरात आहे. यामध्ये कुलदीप आणि गुरुबचन सिंग या दोन्ही भावांनी अखंड कष्ट करत या पातळीपर्यंत कंपनी नेली आहे.
आजमीतिला बर्जर पेंट भारतातच नाही तर पोलंड, रशिया आणि बांगलादेश व इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत असून या दोनही भावांचा बर्जर पेंटमधील प्रत्येकी हिस्सा २९७०० कोटी पेक्षा अधिक आहे.
या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की माणसांमध्ये मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी राहिली तर अशक्य गोष्ट देखील शक्य करता येते.