Indian Railway Rule:- वाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारले असून रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करताना आपल्याला दिसून येतात.
एवढेच नाही तर औद्योगिक आणि कृषी माल देखील रेल्वेच्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवणे सोपे होते. एवढेच नाही तर तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून अनेक गोष्टी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात.
साहजिकच या सगळ्या गोष्टींसाठी रेल्वेचे काही नियम आहेत व काही निश्चित प्रक्रिया देखील आहे. हे नियम आणि प्रक्रिया पाळूनच तुम्हाला रेल्वेच्या सुविधेचा लाभ घेता येतो. यामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्याकडे जर बाईक असेल
आणि तिला जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे असेल तर ती आपण रेल्वेच्या माध्यमातून नेऊ शकतो.
परंतु अशा पद्धतीने जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बाईक न्यायची असेल तर याकरिता देखील एक निश्चित प्रक्रिया आणि नियम असून ते तुम्हाला फॉलो करणे गरजेचे असते. यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात बघू.
रेल्वेतून बाईक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या पद्धती
1- महत्त्वाची पहिली पद्धत- समजा तुम्हाला एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचे आहे किंवा जायचे आहे आणि सोबत तुम्हाला तुमची बाईक न्यायची आहे तर याकरिता तुम्हाला ट्रेन स्टेशनवर पोहोचण्याच्या अर्धा तास आधी पोहोचणे गरजेचे असते.
या पद्धतीमध्ये तुम्हाला तुमची बाईक पार्सल प्रमाणे व्यवस्थित पॅकिंग करावी लागते व लगेज म्हणून बाईक साठी तुम्हाला काही शुल्क देखील देणे गरजेचे असते. याचे बिल तुम्हाला रेल्वे कडून दिले जाते.
जेव्हा तुम्हाला ज्या ट्रेनने प्रवास करायचा आहे ती ट्रेन स्टेशनवर आल्यानंतर ती बाईक लगेजच्या डब्यामध्ये घेऊन जावी लागते व तुम्हाला ज्या ठिकाणी उतरायचे आहे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचल्यावर तिकीट आणि बिल दाखवून बाईक तुम्हाला रेल्वेच्या खाली उतरवता येते.
2- महत्त्वाची अशी दुसरी पद्धत- समजा तुम्हाला पार्सलद्वारे बाईक पाठवायचे आहे तर तुम्हाला रेल्वेच्या पार्सल कार्यालयामध्ये जाऊन त्याची बुकिंग आधी करावे लागते. बुकिंग साठी तुम्हाला एक फॉर्म दिला जातो व त्यावर तुम्हाला बाईकचे संपूर्ण डिटेल्स द्यावी लागते.
डिटेल्स मध्ये तुम्ही बाईक कुठल्या कंपनीचे आहे? तसेच तिचा नोंदणी क्रमांक, बाईकचे वजन, तिची किंमत, कोणत्या ठिकाणी उतरवायचे आहे त्या स्टेशनचे नाव आणि कोणत्या स्टेशनवरून रेल्वेत चढवायची आहे त्या स्टेशनची माहिती इत्यादी द्यावी लागते.
तसेच त्या बाईकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट चे दोन झेरॉक्स तुम्हाला पार्सल कार्यालयामध्ये द्यावे लागतात. पेट्रोलचे टाकी पूर्णपणे रिकामी करावी लागते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे एका कार्डबोर्ड बाईकवर तुम्हाला बांधावे लागेल व बोर्डिंग स्टेशन आणि डेस्टिनेशन स्टेशनचे नाव स्पष्टपणे लिहिणे गरजेचे असते. ही प्रक्रिया करून तुम्ही तुमची बाईक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात.
रेल्वेतून बाईक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी किती खर्च येतो?
तुम्हाला जर रेल्वेच्या माध्यमातून पार्सलने बाईक पाठवायचे असेल तर ते प्रत्येक ट्रेनमध्ये आकारले जाणारे शुल्क हे वेगवेगळे असते. साधारणपणे ट्रेन कोणत्या प्रकाराचे आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणी बाईक पाठवायचे आहे ते अंतर किती आहे
यानुसार शुल्कात बदल होतो. तसेच तुमच्या बाईकचे वजनावर देखील शुल्क अवलंबून असते. साधारणपणे एक अंदाज घ्यायचा असेल तर मुंबई ते पुणे बाईक पाठवायची असेल तर चारशे रुपये खर्च येण्याची शक्यता असते.