Car Insurance:- विमा ही संकल्पना जितकी व्यक्तींसाठी महत्त्वाची आहे तितकीच ती वाहनांच्या बाबतीत देखील महत्त्वाची आहे. वाहनाच्या बाबतीत बघितले तर बरेचदा रस्त्यावर अपघात वगैरे होऊन नुकसान होते व यामध्ये मोठ्या प्रमाणावर नंतर आपल्याला खर्च करावा लागतो.
परंतु वाहनावर जर आपण विमा घेतलेला राहिला तर मात्र आपल्याला संपूर्ण नुकसान भरपाई या माध्यमातून मिळू शकते. वाहन किंवा कार विमा हा महत्वपूर्ण असतो व याचे अनेक प्रकार देखील आहेत. जेव्हा आपण कार विमा घेतो तेव्हा आपले वार्षिक उत्पन्न किती आहे त्याप्रमाणे आपल्याला एक निश्चित प्रीमियम भरणे गरजेचे असते.
परंतु कार विम्याचा जर आपण PAYD म्हणजे पे ऍज यु ड्राईव्ह हा जर प्रकार पाहिला तर हा काहीसा वेगळा असा प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे याप्रमाणे विम्याचा हप्ता भरावा लागत नाही तर तुमच्या कारने किती अंतर कापलेले आहे या आधारे विम्याचा हप्ता तुम्हाला भरावा लागतो. या विम्याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
काय आहे नेमका पे ऍज यू ड्राईव्ह कार विमा?
हा एक कार विम्याचा प्रकार असून यामध्ये तुम्हाला तुमच्या कारने किती अंतर कापले आहे या आधारे प्रीमियम ठरवला जातो. अगदी साध्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे जर तुम्ही कमी अंतर गाडी चालवली तर तुम्हाला या विम्यामध्ये कमी हप्ता भरावा लागेल.
पे एज यु ड्राईव्ह प्रकारचा विमा ड्रायव्हरला वैयक्तिक आणि परवडणारा विम्याचा पर्याय उपलब्ध करून देतो. या विम्यामध्ये प्रामुख्याने या गोष्टींकडे जास्त करून लक्ष दिले जाते व ते म्हणजे…
1- किलोमीटर डिक्लेरेशन– या विम्याच्या प्रकारामध्ये तुम्ही पॉलिसी कालावधीत तुम्ही किती किलोमीटर गाडी चालवली किंवा चालवू शकतात याचा अंदाज दिलेला असतो व त्यानुसार तुम्हाला विम्याचा योग्य स्लॅब निवडायचा असतो.
2- टेलीमॅटीक्स टेक्नॉलॉजीचा वापर– हे एक डिवाइस म्हणजेच उपकरण असून ते वेग, अंतर, दिवसाची वेळ आणि ड्रायव्हिंग पॅटर्न सह ड्रायव्हिंगच्या इतर गोष्टींचा डेटा गोळा करते. हा गोळा केलेला डेटा संबंधित विमा कंपन्यांना जोखमीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी खूप मदत करते.
3- विम्याच्या प्रीमियमचे कॅल्क्युलेशन– तुम्ही जो काही या विमा पॉलिसी अंतर्गत निवडलेला किलोमीटरचा स्लॅब असतो त्यावर आधारित तुमच्या प्रीमियमची गणना विमा कंपनी करते.
4- ट्रेकिंग– तुमच्या कारचे किंवा वाहनाचे मायलेज किती आहे हे टॅलीमॅटीक्स उपकरणाच्या साह्याने किंवा तुमच्या स्मार्टफोन ॲपच्या माध्यमातून ट्रेक केले जाते.
5- विम्याच्या प्रीमियमचे ॲडजस्टमेंट– जेव्हा या प्रकारच्या पॉलिसीच्या कालावधीचा शेवट असतो तेव्हा तुमच्या मायलेजची तुलना तुम्ही नोंद केलेल्या मायलेजशी केली जाते. जर तुम्ही कमी गाडी चालवली असेल तर तुम्हाला परतावा मिळेल. जर तुम्ही नोंद केलेल्या मायलेज पेक्षा जास्त गाडी चालवलेली असेल तर तुम्हाला अतिरिक्त प्रीमियम भरणे गरजेचे राहते.
काय आहेत या विम्याचे फायदे?
1- या अंतर्गत जर तुम्ही कमी गाडी चालवली तर तुम्हाला विम्याचा हप्ता कमी भरावा लागतो. म्हणजेच तुम्ही वापरलेल्या कव्हरेज करिता त्यामध्ये पैसे देतात.
2- या विम्याच्या माध्यमातून बऱ्याच विमा कंपन्या सुरक्षित ड्रायविंग करिता सवलत देतात व तुमच्या ड्रायव्हिंगची पद्धत टेली मॅटिक्सच्या माध्यमातून पाहिली जाते.
3- या प्रकारच्या काही विमा पॉलिसी या फ्लेक्सिबल कवरेजचा पर्याय देतात. म्हणजेच पॉलिसीधारकांना त्यांचे ड्रायव्हिंग कशी आहे त्याच्या सवयी आणि गरज यावर आधारित कव्हरेजचे स्तर निवडता येतात.