Types Of Property Transfer: कशाप्रकारे करता येते मालमत्तेचे हस्तांतरण? किती आहेत मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार? जाणून घ्या माहिती

प्रॉपर्टी घरातील सदस्याकडे जर ट्रान्सफर करायचे असेल तर या दृष्टिकोनातून बघितले तर याचे तीन पर्याय आहेत. या तिन्ही पर्यायांपैकी तुम्ही कुठलाही एक पर्यायाची निवड करू शकतात.

Ajay Patil
Published:
types of property transfer

Types Of Property Transfer:- प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता ही कुठल्याही प्रकारची राहिली तरी तिचे महत्त्व हे नातेवाईकांमध्ये किंवा कुटुंबामध्ये खूप महत्त्वाचे असते. प्रॉपर्टीचे वाटप जर योग्य प्रकारे झाले नाही किंवा इतर काही कारणांमुळे प्रॉपर्टीच्या संबंधित अनेक प्रकारचे टोकाचे वाद उद्भवतात.

प्रॉपर्टी मुळे बऱ्याचदा जवळचे नातेसंबंध देखील तुटतात व असे वाद कोर्टाच्या दारात देखील पोहोचतात. त्यामुळे प्रॉपर्टीच्या संबंधित अनेक गोष्टी खूप बारकाईने करणे खूप गरजेचे असते. प्रॉपर्टीच्या बाबतीत अनेक कायदेशीर बाबी असून त्या अंतर्गत प्रॉपर्टीचे सगळे व्यवहार पार पाडणे गरजेचे असते.

यामध्ये जर आपण बघितले तर एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर म्हणजेच ती प्रॉपर्टी हस्तांतर करण्याला देखील खूप महत्त्व असून त्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागते.

त्या अनुषंगाने जर तुम्हाला देखील तुमच्या नावावरील मालमत्ता एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करायचे असेल तर अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला ते ट्रान्सफर करता येते. भविष्यामध्ये होणारे मालमत्तेचे वाद टाळण्यासाठी प्रॉपर्टी ट्रान्सफर करणे खूप आवश्यक असते व या माध्यमातूनच तुम्ही कायदेशीररित्या मालमत्तेचे मालक होऊ शकतात.

प्रॉपर्टी घरातील सदस्याकडे जर ट्रान्सफर करायचे असेल तर या दृष्टिकोनातून बघितले तर याचे तीन पर्याय आहेत. या तिन्ही पर्यायांपैकी तुम्ही कुठलाही एक पर्यायाची निवड करू शकतात.

परंतु अशाप्रकारे पर्यायांची निवड करताना मात्र प्रत्येक पर्यायाचे महत्त्व वेगवेगळे असल्याने तुम्हाला योग्य तो पर्याय निवडणे गरजेचे असते. जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.

 प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे प्रकार त्यांचे महत्त्व

1- सेल डीड सेल डिड किंवा यालाच ट्रान्सफर डिड असे देखील म्हटले जाते. या पर्यायामध्ये मालमत्तेची नोंदणी सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये करणे गरजेचे असते. त्यानंतर मालमत्ता नवीन मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली जाते.

परंतु यामध्ये मालमत्ता खरेदी करणारी व्यक्ती तुमच्याशी संबंधित नसावी. मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी ही सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत असून कुठल्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी मालमत्ता हस्तांतरित करण्याचा हा एक सोपा असा मार्ग आहे. नोंदणीकृत सेल डिड हा मालमत्ता विक्री करण्याचा पुरावा असतो.

2- गिफ्ट डीड या प्रकारे तुम्ही कोणत्याही आर्थिक व्यवहाराशिवाय जंगम आणि स्थावर मालमत्ता एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकतात. स्थावर मालमत्ता गिफ्ट म्हणजेच भेट देण्यासाठी स्टॅम्प पेपरवर डिड करावे लागते. त्यानंतर दोन साक्षीदारांनी साक्ष दिल्यानंतर निबंधक कार्यालयामध्ये ते सादर करावे लागेल.

नोंदणी कायदा 1908 च्या कलम 17 नुसार स्थावर मालमत्तेची नोंदणी करणे अनिवार्य असून तुमच्या नातेवाईकाला कोणत्याही प्रकारचे मालमत्ता गिफ्ट केल्यास कराचा त्रास होणार नाही. इथे नातेवाईक या शब्दाचा अर्थ बघितला तर यामध्ये पत्नी तसेच भावंड, पत्नी किंवा पतीची भावंड किंवा पालकांची भावंड असा होतो.

2- रेलिंक्वीश(Relinquish) डीड तुम्ही एखाद्या मालमत्तेचे शेअर होल्डर असाल आणि तुमचे हक्क सोडायचे असतील तर हा प्रकार किंवा हा पर्याय खूप उत्तम आहे. गिफ्ट डीड प्रमाणे कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार न करता ते देखील बदलले जाऊ शकत नाही. या प्रकारामध्ये दोन साक्षीदारांनी साक्ष दिल्यानंतर कायदेशीर नोंदणी केली जाते.

या पर्यायामध्ये मात्र मुद्रांक शुल्कात नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची सूट किंवा करात सूट मिळत नाही. साधारणपणे हा पर्याय एखाद्या व्यक्तीने जर मृत्युपत्र न करता त्याचे निधन झाले आणि कायदेशीर वारसांना मालमत्तेचा वारसा द्यायचा आहे तर हा पर्याय वापरला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe