बीटेक करून ‘या’ तरुणाने निवडला दूध व्यवसाय! आज दूध विकून वर्षाला कमवतो 80 लाख रुपये उत्पन्न, कसे आहे त्याचे डेअरी फार्मिंगचे नियोजन?

उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथील बेलवा मोती या गावाचा वरूण याचे घेता येईल. या तरुणाने बी टेक पूर्ण केले व त्यानंतर नोकरी न करता मात्र दूध व्यवसायामध्ये पडण्याचा निर्णय घेतला व दूध विक्री व्यवसाय सुरू केला. त्याचा हा धाडसी निर्णय त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन गेला.

Ajay Patil
Published:
business idea

Dairy Farming Business:- आजचे उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या नसल्यामुळे आणि काहींना नोकरी असून देखील त्या नोकऱ्यांना टाटा बाय बाय करत शेती व्यवसायामध्ये नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत. उच्चशिक्षित तरुण शेती क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र कृषी क्षेत्राचे पार रुपडेच पालटून गेल्याचे सध्या चित्र आहे.

कारण असे तरुण उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असल्याने ते शेतीमध्ये त्याचा अवलंब करत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून लाखोत कमाई करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यासोबतच दूध व्यवसायासारख्या शेतीच्या जोडधंद्यामध्ये देखील अनेक तरुणांनी यशस्वी होण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केलेला आहे.

हायटेक पद्धतीचा दूध व्यवसाय करून विश्वास बसणार नाही इतकी कमाई बरेच तरुण करत आहे व त्यातीलच एक जर नाव आपण घ्यायचे म्हटले तर उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथील बेलवा मोती या गावाचा वरूण याचे घेता येईल.

या तरुणाने बी टेक पूर्ण केले व त्यानंतर नोकरी न करता मात्र दूध व्यवसायामध्ये पडण्याचा निर्णय घेतला व दूध विक्री व्यवसाय सुरू केला. त्याचा हा धाडसी निर्णय त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन गेला.

2013 मध्ये सुरू केला व्यवसाय
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खेरी येथील बेलवा मोती या गावचा राहणारा वरूण चौधरी याने अगदी शून्यातून दूध व्यवसायाला सुरुवात केली. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या वरूण याने 2013 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. आज त्याच्याकडे साधारणपणे 200 गाई आणि म्हशी असून त्यांचे दूध तो पराग मिल्क फुड्सला सप्लाय करतो.

त्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या गोठ्यामध्ये थारपारकर, जर्सी तसेच साहिवाल या गाईंच्या प्रजाती तर मुर्रासारख्या म्हशींच्या प्रजाती देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत असलेल्या गाई आणि म्हशीकरता लागणारा चारा तो स्वतःच्या शेतात पिकवतो.

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये दूध उत्पादन बघितले तर ते 700 लिटर पर्यंत होते व हिवाळ्यामध्ये बाराशे लिटर पर्यंत ते वाढते. उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे दूध उत्पादक म्हणून देखील त्याला ओळखले जाते व सहा वेळा गोकुळ पुरस्कार त्याला मिळाला आहे.

हायटेक डेअरीची केली आहे उभारणी
वरूण चौधरीने गाई व म्हशीकरिता उभारलेला गोठा हा ऑटोमॅटिक पद्धतीचा उभारला असून गाई म्हशींची दूध देखील मिल्किंग मशीनच्या माध्यमातून काढले जाते.

त्याच्याकडे बी लेवल कंपनीचा सेटअप पासून ही कंपनी डेअरी सेटअप प्रदान करते असे देखील वरूण यांनी सांगितले. तसेच स्वयंचलित मिल्किंग मशीन चा समावेश या सगळ्या अत्याधुनिक यंत्रांमध्ये करण्यात आला असून त्यामुळे दूध काढण्याचे काम खूप सोपे होते व दुधाचा दर्जा देखील उत्तम राखला जातो.

किती आहे त्याच्या डेअरी फार्मिंगची उलाढाल?
आज वरूण चौधरी हा त्याच्या डेअरी व्यवसायातून साधारणपणे वर्षाला 90 लाख ते कोटी रुपयांच्या दरम्यान उलाढाल करतो. त्याची जर भविष्यातील प्लॅनिंग बघितली तर तो हा व्यवसाय आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असून येणाऱ्या कालावधीत दुधापासून इतर दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा निर्णय देखील त्याने घेतला आहे व लवकरच तो दुग्धजन्य पदार्थ निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe