कुठल्याही जमिनीच्या वादामध्ये किंवा खरेदी विक्री व्यवहारात ‘ही’ कागदपत्रे सिद्ध करतात तुमचा जमिनीचा मालकी हक्क! तुमच्याकडे अवश्य असावीत

जमिनीच्या संदर्भात जर बघितले तर अनेक प्रकारचे वादविवाद होताना आपल्याला दिसून येतात. कधी कधी हे वाद इतके टोकाला पोहोचतात की प्रकरण कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचते. कधी कधी असे वाद हे जमिनीच्या मालकी हक्काविषयी होतात तर कधी जमिनीची हद्द, शेती रस्त्यांवर उद्भवणारे वाद असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या बाबतीत उद्भवू शकतात.

Ajay Patil
Published:
land

Documents of Land:- जमिनीच्या संदर्भात जर बघितले तर अनेक प्रकारचे वादविवाद होताना आपल्याला दिसून येतात. कधी कधी हे वाद इतके टोकाला पोहोचतात की प्रकरण कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचते. कधी कधी असे वाद हे जमिनीच्या मालकी हक्काविषयी होतात तर कधी जमिनीची हद्द, शेती रस्त्यांवर उद्भवणारे वाद असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या बाबतीत उद्भवू शकतात.

अशा वादांमध्ये जमिनीशी संबंधित असलेली महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे असते. कारण तुमची त्या जमिनीवरची मालकी हक्क सिद्ध करणे खूप गरजेचे असल्याने हे कागदपत्रे तुम्हाला फायद्याचे ठरतात.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये देखील तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते व संबंधित जमिनीचे तुम्ही मालक आहात याचा पुरावा म्हणून काही कागदपत्रांची आवश्यकता भासते.

त्यामुळे या लेखात आपण अशी कोणती कागदपत्रे आहेत की ज्यावरून तुमची जमिनीची मालकी हक्क सिद्ध होते अशा कागदपत्रांची माहिती या लेखात थोडक्यात बघू.
हे कागदपत्र सिद्ध करतात जमिनीवरील तुमचा मालकी हक्क

1- सातबारा उतारा- आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे जमिनीचा सातबारा उतारा होय.

उताऱ्यामध्ये आपल्याला माहित आहे की शेतकऱ्याकडे किती जमीन आहे? त्या जमिनीवर नेमका कुणाकुणाचा अधिकार आहे? इत्यादी सगळी माहिती दिलेली असते. त्यामुळे सातबारा उताऱ्यावरून जमिनीच्या मालकाची ओळख सहजरित्या होते.

2- खरेदीखत- जमिनीचा खरेदी विक्री व्यवहारांमध्ये खरेदी खत आवश्यक पाहिली जाते व हे जमिनीचा मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक आवश्यक कागदपत्रे असून त्याला जमिनीचा प्रथम मालकी हक्क पुरावा समजला जातो.

खरेदी खतमध्ये जमिनीचा व्यवहार कोणत्या तारखेला झाला यापासून तर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला व किती रुपयांना झाला? याचा संपूर्ण इतिहासच नोंद केलेला असतो.

3- जमीन मोजणीचे नकाशे- बऱ्याचदा जमिनीच्या मालकी हक्का विषयी अनेक वादविवाद उद्भवतात व अशावेळी जमिनीची मोजणी केली जाते. अशा मोजणी वेळी तुमच्याकडे त्या जमिनीच्या मोजणीचे नकाशे उपलब्ध असणे गरजेचे आहे व यावरून तुमच्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो

व जमीन मोजणीचे नकाशे हे जपून ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते. यामध्ये एका ठराविक गटाच्या नकाशातील शेतजमीन नेमकी कोणाच्या नावावर आहे आणि त्या शेतकऱ्याचे नाव व किती जमीन त्याच्या मालकीची आहे? इत्यादी माहिती सविस्तरपणे दिलेली असते.

4- जमीन महसूल भरल्याच्या पावत्या- तलाठ्याकडे आपण जमिनीचा संदर्भात महसूल भरतो व तलाठ्याकडून त्या संदर्भातील पावती आपल्याला दिली जाते व ही पावती देखील जमिनीचा मालकी हक्काबाबत एक महत्त्वाचा पुरावा ठरतो.

त्यामुळे प्रत्येक वर्षाच्या पावत्या एका फाईल मध्ये व्यवस्थित रित्या जपून ठेवणे खूप गरजेचे असते. म्हणजे तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही या पावत्यांचा वापर पुरावा सिद्ध करण्यासाठी करू शकतात.

5- प्रॉपर्टी कार्ड- जमीन जर एनए म्हणजेच बिगरशेती असेल तर अशा जमिनीच्या मालकी विषयी खूप सावधानता बाळगणे गरजेचे असते. अशा जमिनीवर मालमत्तेचा हक्क सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय.

जसे सातबारा उताऱ्यावर जमीन कुणाच्या मालकीची आहे याचा उल्लेख असतो व ती जमीन किती आहे याचा देखील उल्लेख असतो अगदी त्याच पद्धतीची माहिती प्रॉपर्टी कार्डवर देखील असते.

6- खाते उतारा- आपल्याला माहित आहे की एखादी जमिनी वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असते. अशा सगळ्या गट क्रमांकाची शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.

खाते उतारा म्हणजेच आठ अ उताऱ्यामुळे तुमच्या नावावर असलेली जमीन कोण कोणत्या गटात आहे याची माहिती तुम्हाला कळते. जमिनीच्या मालकी हक्काच्या पुराव्या करिता खाते उतारा किंवा 8 अ चा उतारा महत्वाचे कागदपत्र मानले जाते.

7- जमिनी संबंधित पूर्वी कोर्टात खटला असेल तर त्याची कागदपत्रे- जमीन तुमच्या मालकीचे असेल व त्या जमिनी बाबत अगोदर कोर्टामध्ये काही खटला चालला असेल तर त्या केसची कागदपत्रे, लागलेल्या निकालाचे पत्रक इत्यादी कागदपत्र देखील सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. कारण या कागदपत्राचा वापर देखील जमिनीचा मालकी हक्काचा दावा करण्यासाठी तुम्हाला कामी येऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe