ट्रांजेक्शन फेल झाल्यास घाबरू नका, बँक रोज देईल 100 रुपये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जर आपले ट्रांजेक्शन फेल झाले असेल तर ही बातमी खरोखर आपल्या फायद्याची आहे. एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा बँक ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातात, पैसे त्यांच्या खात्यातून वजा केले जातात, परंतु पैसे बाहेर येत नाहीत.

अशा परिस्थितीत ग्राहक अस्वस्थ होतो आणि बँकेशी संपर्क साधतो, परंतु त्यानंतरही बर्‍याच वेळा पैसे मिळत नाहीत. जर तुमच्या बाबतीतही असे काही झाले असेल तर काळजी करू नका. अशा तक्रारी रोज बँकांमध्ये येतात. चांगली गोष्ट म्हणजे बँक आपल्याला पैसे परत करेल.

बँका दररोज 100 रुपये भरपाई देतात :- अशा परिस्थितीत बँकेने वजा केलेली रक्कम त्वरित बँकेला परत करावी लागते. जर आपल्या बाबतीत असे घडले असेल किंवा आपल्याला बँकेच्या या नियमांबद्दल माहिती नसेल तर तर जाणून घ्या कि तक्रार दाखल केल्याच्या 7 दिवसांत पैसे परत न झाल्यास बँक आपल्याला दररोज 100 रुपये भरपाई देते. फेल ट्रांजेक्शनच्या बाबतीत 20 सप्टेंबर 2019 पासून आरबीआयचे हे नियम लागू आहेत.

यूपीआई ट्रांजेक्शन फेल झाल्यास काय करावे ? :- तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा डिजिटल व्यवहार करून पैसे परत न मिळाल्यास तुम्ही यूपीआय अ‍ॅपवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला पेमेंट हिस्ट्री ऑप्शनवर जावे लागेल. येथे आपल्याला रेज डिस्प्यूट वर जावे लागेल. रेज डिस्प्यूट वर आपली तक्रार नोंदवा. आपली तक्रार योग्य असल्यास बँक पैसे परत करेल.

एटीएम ट्रांजेक्शन फेल झाल्यास करा ‘हे’ काम:-  आपण एटीएममधून ट्रांजेक्‍शन केल्यास आणि ट्रांजेक्‍शन अयशस्वी झाल्यास, बँकांकडून पेनल्टी घेण्यासाठी 30 दिवसांच्या आत तक्रार द्यावी लागेल. तुम्हाला तुमची तक्रार बँकेकडे ट्रान्झॅक्शन स्लिप किंवा अकाउंट स्टेटमेंटद्वारे द्यावी लागेल. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डाची माहिती बँकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यास सांगावी लागेल. जर आपले पैसे 7 दिवसांच्या आत परत केले गेले नाहीत तर आपल्याला परिशिष्ट 5 फॉर्म भरावा लागेल. ज्या दिवशी आपण हा फॉर्म भराल त्याच दिवशी आपली पेनल्टी सुरू होईल.

कोणत्या बँकेचे किती टक्के ट्रांजेक्शन फेल झाले ते जाणून घ्या :- एनपीसीआयच्या अहवालानुसार कॉर्पोरेशन बँकेत, शासकीय बँकेत ग्राहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. सुमारे 14.8 टक्के व्यवहार अयशस्वी झाले आहेत. तर, कॅनरा बँकेत 9.8 टक्के, बँक ऑफ इंडियामध्ये 4.2 टक्के व्यवहार अयशस्वी झाले आहे. त्याच वेळी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 3.7 टक्के व्यवहार अयशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक खासगी बँकांमधील एका टक्क्यांपेक्षा कमी व्यवहार अयशस्वी ठरले आहेत. कोटक महिंद्रा बँकेत ऑक्टोबरमध्ये 2.36 टक्के व्यवहार अयशस्वी झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment