अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- भीमाकोरेगाव प्रकरणातील सर्व भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावे, महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज प्रकरण सुरू व्हावे, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळावे व एसी एसटी प्रवर्गातील विध्यार्थीना नियमितपणे स्कॉलरशिप मिळण्यासाठी
राज्य सरकारकडे शिफारस करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार ना. शरद पवार यांना देण्यात आले.
अहमदनगर शहराच्या दौर्यावर ना. पवार आले असता त्यांना आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, जमीर इनामदार, संतोष पाडळे, साहिल सय्यद, अरबाज शेख यांनी निवेदन दिले. भीमकोरेगाव प्रकरणात महाराष्ट्रातील बहुसंख्य भीमसैनिकांवर 308 व इतर बरेच गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. भाजपने सूडबुद्धीने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.
त्यामुळे अनेक युवकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसाधारण जनतेची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला व नोकर्या गेल्या आहेत. त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिल्यास त्यांना आपला व्यवसाय सुरु करता येणार आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
मुस्लिम समाजाची शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती मागासलेपणाची आहे. या समाजालाही आरक्षण मिळावे या साठी सर्वच स्तरावरून मागणी होत आहे. मुस्लिम समाजाची आर्थिक प्रगती फारशी झालेली नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षणाची गरज आहे. तसेच धनगर समाजाची देखील परिस्थिती गंभीर असून, त्यांचे भटकंतीचे जीवन सुरु आहे. या समाजाला प्रवाहात आनण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.
भाजपच्या काळात एसी, एसटी प्रवर्गातील विध्यार्थीना नियमित कधीच स्कॉलरशिप मिळालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तरी राज्य सरकारकडे शिफारस करुन भीमाकोरेगाव प्रकरणातील सर्व भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावे,
महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज प्रकरण सुरू व्हावे, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळावे व एसी एसटी प्रवर्गातील विध्यार्थीना नियमितपणे स्कॉलरशिप मिळण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved