file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- जिल्हा कोणताही असो पैसे उत्पनाचे स्रोत म्हणून वाळू तस्करी करणारे अनेकजण आतापण पहिले असतील. महसूलच्या नाकावर टिच्चून हे तस्कर वाळू उपसा करतात व आपला व्यवसाय सुरु ठेवतात.

मात्र आता या अवैध धंदे चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. प्रवरा, मुळा, म्हाळुंगी या नद्यांच्या पात्रातून वाळूचा अवैधरीत्या उपसा करत रिक्षा, ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच छोट्या-मोठ्या चारचाकी वाहनांतून वाळू वाहिली जाते.

शहरालगत असलेल्या कासारा दुमाला येथून ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून अवैधरीत्या वाळू वाहिली जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. हे पथक कारवाईसाठी संगमनेरात आले असता त्यांना अमोल गोदाडे आणि चिमा सूर्यवंशी हे दोघे ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून अवैधरीत्या वाळू वाहताना आढळून आले.

ट्रॅक्टर-ट्रॉली व ट्रॉलीमधील वाळू असा मुद्देमाल जप्त करत गोदाडे याला पकडण्यात आले. तर सूर्यवंशी हा पसार झाला. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक सचिन दत्तात्रय अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गोदाडे याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अडबल, पोलीस कॉस्टेबल रणजित जाधव, राहुल सोळुंके यांनी कारवाई केली.