file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- चारा घेऊन जात असलेल्या बैल गाडीला थांबवून दारूच्या नशेत तिघां जणांनी प्रतिक लव्हे याला लोखंडी गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटन राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे.

प्रतिक रमेश लव्हे राहणार गौतम नगर, रेल्वे स्टेशन याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २ ऑगस्ट रोजी १२ वाजे दरम्यान प्रतिक लव्हे व त्याचा मित्र लखन बैरुनाथ म्हस्के हे दोघे अष्टविनायक शाळे शेजारील शेतामधुन गुरांसाठी बैलगाडीमध्ये चारा आणण्यासाठी रेल्वे स्टेशन ते आरडगाव रोडने जात असताना रेल्वे बोगद्याखाली आरोपी हे तेथे दारुचे नशेत उभे होते.

त्यांनी प्रतिक लव्हे व त्याचा मित्राला थांबवीले. तेव्हा ते दोघे गाडीच्या खाली उतरुन काय झाले याबाबत विचारले. तेव्हा आरोपींनी त्या दोघांना काय रे तुम्ही इकडे कसे काय आलात.

असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करत लाथा बुक्क्याने व लोखंडी गजाने मारहाण केली. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला असता ते त्यांचे कडील बजाज पल्सर गाडीवर पळुन गेले.

या मारहाणीत प्रतिक लव्हे याच्या गळ्यातील ओम व मोबाईल गहाळ झाला आहे. प्रतिक रमेश लव्हे याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन चव्हाण, राहणार तांदुळवाडी. तसेच गोकुळ म्हसे,

भारत पोपट म्हसे दोघे राहणार कोंढवड या तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.