अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- एक्साईजच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू झालाय. या घटनेमुळं अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मात्र, पोलीस कोठडीत असताना आरोपी पळालाच कसा? त्याचा मृत्यू अपघातात झालाय की काही घातपात आहे? असा सवाल आरोपींच्या नातेवाईकांनी केलाय. याबाबत अधिक माहिती अशी कि,

राहता शहरातील जनार्दन बंडीवार याला दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरगाव विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती.

सुरुवातीला ताडी विक्री करणाऱ्या जनार्दनचा व्यवसाय बंद असताना अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. दोन दिवसापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत असलेल्या जनार्दनचा आज बाभळेश्वर गावातील चौकात कंटेनर खाली मृत्यू झालाय..

हा मृत्यू नेमका कसा झाला? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. जर जनार्दन पोलीस कोठडीत होता तर त्याचा अपघात झालाच कसा? असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी उपस्थित केला आहे.

सदर घटनेचा तपास आता लोणी पोलीस स्टेशन करत आहे. या आरोपीचा मृत्यू कसा झाला? त्या हे चौकशी नंतर स्पष्ट होणार असल्याचं डिवायएसपी संजय सातव यांनी म्हटलंय. दरम्यान केवळ पैसे मिळवण्यासाठी एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी जनार्दनचा बळी दिल्याचा आरोप आता केला जातोय.