अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. चोवीस तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

सलमान उर्फ मायकल एजाज शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी प्रकाश रावसाहेब उमाप (रा. नालेगाव) यालाही अटक करण्यात आली.

पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, शहर विभागाचे उपअधिक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुनिल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.