अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- रिझर्व्ह बँकेने दोन वर्षांपूर्वी प्रशासक नेमल्यानेच अर्बन बँक वाचली, केवळ सभासद, ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही लढाई आम्ही लढत आहोत.

अर्बन बँकेतील बनावट सोनेतारण घोटाळा शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनीच उघडकीस आणला. मात्र, त्यांच्यावरच आत्महत्येची वेळी आली.

बँकेसाठी त्यांनी एक प्रकारे दिलेले हे बलिदान असून, ते आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन अर्बन बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी केले.

नगर अर्बन बँकेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी आले होते.या वेळी गांधी म्हणाले, करोडो रुपयांच्या गैरव्यवहारामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडतात.

ठेवीदारांना आत्महत्या कराव्या लागतात. अर्बन बँकेची वाटचाल ही त्याच दिशेने चालू होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने दोन वर्षांपूर्वी प्रशासक नेमला नसता तर अर्बन बँक बंद पडली असती असा धक्कादायक गौप्यस्पोट त्यांनी केला.