file photo

अहमदनगर – पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार येथे उभ्या केलेल्या ग्रामविकासाच्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. पुढील काळातही पवार याना पद्मभूषण मिळावा अशा सदिच्छा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

पोपटराव पवार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यानंतर आज दिल्ली येथून परतत असताना पोपटराव पवार यांनी सपत्नीक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पवार हे काहीसे भावनिक झाले होते.

यावेळी बोलताना समाजसेवक आण्णा म्हणाले, पोपटराव पवार हे आपले सुरूवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत त्यांना तसेच राजस्थान येथील श्यामसुंदर तालेवार या यांनादेखील पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आपल्या दोन कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याचा आनंद अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.

राळेगण-सिद्धी परिवाराच्यावतीनेही पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, दत्ता आवारी, संजय पठाडे, ठकाराम राऊत, सुनील हजारे, श्याम पठाडे उपस्थित होते.