Agriculture News : शेती (Farming) म्हटलं म्हणजे शेतजमिन (Farmland) आलीच. मित्रांनो शेत जमीन ही कोणाची ना कोणाची मालकीची असते. आता शेतजमीन ही कोणाच्या मालकीचे आहे हे ठरवण्यासाठी शेत जमिनीचा सातबारा (7/12) हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. सातबारा वरूनच शेतजमिनीचा खरा मालक कोण हे स्पष्ट होतं असते.

एकंदरीत सातबारा हा शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा हा एक महत्त्वाचा सरकारी पुरावा (Government Document) आहे. सातबारा उताऱ्यावरून शेतजमीन नेमकी कोणाची आहे हे स्पष्ट होत असते. मित्रांनो शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना सातबाऱ्याची आवश्यकता असते तसेच यावेळी सातबाराची पडताळणी देखील केले जाते.

बिना सातबारा जमिनीची खरेदी-विक्री होऊच शकत नाही. मात्र अनेकदा अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये सातबारा खोटा दाखवून कर्ज घेतले गेले आहेत तर काही ठिकाणी जमिनीचा व्यवहार देखील खोट्या सातबाऱ्यावर घडवून आणली गेली आहेत. अनेकदा शेतकरी बांधवांची खोटा सातबारा वापरून जमीन खरेदी विक्री करताना फसवणूक केली जात असते.

अशा परिस्थितीत सातबारा नेमका खरा कोणता आणि खोटा कोणता हे कसं ओळखायचं हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मध्यात असतो. यामुळे आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी खरा किंवा खोटा सातबारा कसा ओळखायचा याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

सातबारावरील तलाठ्याची सहीची पडताळणी करावी लागते बर…!

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे सातबाऱ्यावर किंवा जमिनीच्या उताऱ्यावर तलाठ्याची सही केलेली असते. मित्रांनो जर सातबाऱ्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा खोटा किंवा बोगस असतो.

सातबारा उतारा वर तलाठी तात्याची स्वाक्षरी नसली की समजायचं तो सातबारा हा खोटा आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आता सातबारा उतारा वर तलाठ्याची डिजिटल सही यायला लागली आहे. याठिकाणी डिजिटल स्वाक्षरीही ही वैध असते याची शेतकऱ्यांनी दखल घ्यावी.

क्यूआर कोडं पण असतो बर…!

मित्रांनो अलीकडे भारतात सर्व ठिकाणी क्यूआर कोड बघायला मिळतीलं. भारतात डिजिटल युग आले आहे अशा परिस्थितीत प्रत्येक काम हे ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे. सरकारी कामापासून ते वित्तीय व्यवहार करण्यापर्यंत सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धती आता रूढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा पुरावा देखील आता ऑनलाईन मिळू लागला आहे.

आता शेतकरी बांधव ऑनलाइन पद्धतीने सातबारा पाहू शकतात. अशा परिस्थितीत जर सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड नसेल तर तो सातबारा बोगस किंवा खोटा समजावा. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की, सातबारा उताऱ्यावर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून ओरिजनल सातबारा पाहता येतो.

एलजीडी कोड तसेच ई-महाभुमीचा लोगो सातबाऱ्यावर असायला हवा बर…!

मित्रांनो आता शासनाने केलेल्या नवीन बदलानुसार, सातबारा उताऱ्यावर त्या गावाचा युनिक कोड देण्यात येतो. म्हणजेच जर सातबाऱ्यावर हा युनिकोड असेल तरच तो सातबारा हा खरा समजावा अन्यथा तो सातबारा खोटा असतो. याशिवाय 2 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने बारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा तसेच ई-महाभूमीचा लोगो टाकण्यास मान्यता दिली आहे.

जर सातबारा उताऱ्यावर ई-महाभूमी चालोगो असेल तेव्हाच तो सातबारा ओरिजनल किंवा खरा समजावा अन्यथा तो सातबारा खोटा किंवा बोगस असतो. अशा पद्धतीने जमिनीचा सातबारा किंवा उतारा खरा किंवा खोटा ओळखला जाऊ शकतो. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी जमिनीचा सौदा करताना नेहमी अपडेटेड सातबाराचं उपयोगात आणला पाहिजे. कारण की नव्याने केलेले बदल हे अपडेटेड सातबारा मध्येच राहणार आहेत.