अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८रा. भातकुडगाव ता. शेवगाव) यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि शिंदे हे मंगळवारी दुपारी भातकुडगाव येथील त्यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत कुटुंबियांना आढळून आले. त्यांना तत्काळ शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान मयत शिंदे यांचे चुलत भाऊ कचरू शिंदे यांनी याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याची चर्चा आहे. अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण अपहार नुकताच चव्हाट्यावर आला आहे. कर्जदारांनी बँकेत गहाण ठेवलेले सोने संशयास्पद असून

त्याची चाैकशी करावी असे पत्र गोरक्षनााथ शिंदे यांनी २०१८ मध्ये बँकेचे संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. या पत्रावर मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. याच तणावातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.मंगळवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.केल्याने खळबळ उडाली आहे.