file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- शिक्षण डीएमएलटी असताना व मान्यता नसूनही रुग्णांची रक्त तपासणी केली.

तर लॅब टेक्निशन म्हणून काम करुन रिपोर्टवर सही करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घुलेवाडी येथील संजीवन हॉस्पिटल मधील नितीन द्रुपद माळी व नवीन नगर रोडच्या दिशा क्लिनिकल लॅबोरेटरीज मधील विकास कडलग, सुद्धा नवले (पूर्ण नाव माहिती नाही) आदींवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. निमोणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपिका संतोष पालवे व डॉ. मछिंद्र गणपत साबळे यांच्या निदर्शनास या बोगस लॅब चालकांचे रिपोर्ट हाती लागले. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. शहर पोलिसात त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमान्वये तिघांवर गुन्हे दाखल केले आहे.

तपास सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे करीत आहे. कोरोना महामारीत रुग्णांच्या आरोग्याशी खेळून पाहणाऱ्या अशा बोगस लॅब चालकांवर कठोर कारवाई करा. तर या पार्श्वभूमीवर शहरातील अन्य रुग्णालयांची चौकशी करा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.