अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-   पारनेर तालुक्यातील जामगांवमध्ये एका महिलेचा तिच्या नवऱ्याने खुन करून फरार झाला आहे. प्राथमिक माहिती नुसार हे कुटुंब रायगड जिल्ह्यातील आहे. व कामानिमित्त पारनेर येथे आले होते.(Ahmednagar Breaking: Husband kills wife)

मृत महिला शेवंता मच्छू नाईक ( वय 45 वर्ष ) रा .नागदारी ता .अलिबाग जिल्हा.रायगड असून ती व तिचा नवरा मच्छू नाईक हे महिन्या भरापासून ते जामगांव येथे बाहेरील एका ठेकेदाराकडे काम करत होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आज सकाळी नेहमी प्रमाणे त्याच्या सोबत काम करणारे कामावर झाडे तोडायला निघाले असता मृत महिला शेवंता व तिचा पती मच्छू लवकर उठले नाही म्हणून त्याच्या सोबत काम करणारे कामाला सकाळी 6 वाजता निघून गेले

व 12वाजून 15 मिनिटांनी जेवणं करायला घराकडे आले असता अजून कामावर का आला नाही व कामावरून पळून गेला की काय याची खात्री करायला त्याच्या राहत्या झोपडीत जाऊन पाहिले

यावेळी शेवंता मृत अवस्थेत दिसून आली व तिचा नवरा सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत होता व तो सकाळी पळून गेला अशी माहिती सोबत काम करणाऱ्या व्यक्तीनी दिली.

या संदर्भातील माहिती आसपास राहणाऱ्या नागरिकांना कळावली व नागरिकांनी पारनेर पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.