अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- शहरातील लालटकी भागात असलेल्या एव्हरेस्ट ऑटो कन्सल्टींग या दुकानाच्या मागे असलेल्या दुचाकी गाड्यांना आग लागल्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे .या मध्ये गाड्यांचे नुकसान झालेले आहे. आज दुपारी बाराच्या सुमाराला येथील लाल टाकी परिसरात असलेल्या एवरेस्ट ऑटो सेंटर च्या मागे ठेवण्यात आलेल्या दुचाकी गाड्या उभ्या केलेल्या होत्या,

अचानक पणे याठिकाणी धुराचे लोट दिसून आले, दुकानांमध्ये काही व्यक्ती या काम करत होत्या, त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ महानगरपलिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ या ठिकाणी हजर होऊन त्यांनी अवघ्या दहा मिनिटांमध्ये लावलेली आग आटोक्यात आणली.

या आगीमध्ये अनेक दुचाकीचे नुकसान झालेले आहे. या ठिकाणी जुन्या गाड्यांची देवाणघेवाण म्हणजेच खरेदी विक्री होत असे ,नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी आले होते. या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम पोलिसांनी केले.