The dead man's body. Focus on hand

Ahmednagar Breaking  :- पारनेर तालुक्यातुन एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे,पारनेर तालुक्यातील जवळे गावातील बरशीले वस्तीवर १६ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह तिच्या घरी आढळून आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि नेहमीप्रमाणे मुलीचे आई वडील सकाळी मोल मजुरीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ क्लास साठी निघून गेला.

त्यानंतर या मुलीचा घात पात झाला असावा अशी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या मृतदेहाजवळ एक कापडी बोळा आढळून आल्याने सांगण्यात आले.

दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

त्याने आरडा ओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. मुलीस खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

मुलीच्या मृतदेहाजवळ एक चाकु तसेच टॉवेलच्या तुकड्याचा बोळा आढळून आल्याची माहिती पुढे आली असून चाकुचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्यातच तिचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा सध्या सुरु आहे.

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस ठाण्याच्या बाथरूम मधे गळफास घेतलेल्या व्यक्तीची ओळख पटली !

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचे शीर दुसऱ्या दिवशी सापडले

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट ! आज वाढले फक्त इतकेच रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स