अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यातील कोंभळीचे उपसरपंच गोरक्ष उत्तम गांगर्डे ( वय : ४० ) यांचे अपघाती निधन झाले . शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला .

गोरक्ष गांगर्डे हे रात्री ८ वाजेच्या सुमारास कोंभळी येथून घोगरगाव रस्त्याने दुचाकीवरून आपल्या फार्मवर चालले होते . समोरून येणाया ओमनी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली .

मोठा आवाज झाल्यानंतर शेजारच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली . त्यावेळी ते रस्त्यावर कोसळलेले होते . त्यांना उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले .

मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते . जनसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारे युवा नेतृत्व हरपल्याने कोंभळीसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे .