अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Breaking :- अल्पवयीन मुलाला झुडपांत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुखदेवरामा गणेशरामा (वय ४५, मूळ रा. नागोरी, राजस्थान) असे त्याचे नाव आहे.

आरोपी लष्करी गणवेशात होता, एवढीच माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारे नगर पोलिसांनी चिकाटीने तपास करून लष्करी प्रशासनासमोर पुरावे सादर केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नगरच्या सावेडी उपनगरात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. त्या दिवशी सायंकाळी एक तेरा वर्षांचा मुलगा सायकलवरून जात होता. त्यावेळी लष्करी गणवेशातील एक व्यक्ती त्याला भेटली.

त्याला थांबवून येथे लघुशंका करण्याची जागा कोठे आहे, असे विचारून त्याला रस्त्याच्या बाजूला झुडपात ओढत नेले.

तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आणि कोणाला सांगू नको, अशी धमकी देऊन निघून गेला. मुलाने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना याची माहिती दिली.

त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. आरोपीने लष्करी गणवेश घातला असल्याची माहिती मुलाने पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला.

चार दिवसांत पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. घटनेच्या दिवशी आरोपी सुखदेवरामा आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे गेलेला होता.

तसे जबाबही त्याच्यासोबत असलेल्या जावानांचे नोंदविण्यात आले आहेत. ​अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.