file photo

संगमनेर पठारभागातील खंदरमाळवाडीच्या माहुली येथील पाझर तलावात गणेश तुकाराम घोडेकर (वय ३५, पिंपळगाव खांड, अकोले) या तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

मंगळवारी सकाळी घटना उघडकीस आल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे. घोडेकर भाऊबीजेच्या दिवशी माहुलीला पाहुण्यांकडे आला होता. कामाला जातो सांगून तो निघून गेला.

मात्र त्याचा मृतदेह माहुली पाझर तलावात पाण्यावर तरंगत्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेच्या कुटीर रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन नातेवाईकांना देण्यात आला. शंकर वाकचौरे यांच्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास सुरु आहे.