file photo

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- आज सकाळी कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदिवरील जुन्या पुलावर निबे वस्ती च्या समोर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला.

सदरची घटना कळताच कोल्हार पोलीस स्टेशनचे श्री.लबडे साहेब व श्री कुसळकर साहेब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृत व्यक्ती जवळील सामानाची पीशवी तपासली असता

त्यात मिळुन आलेल्या डायरीवरून त्यांनी मृत व्यक्ती कोन आहे याचा शोध लावला.सदर मृत व्यक्तीचे नाव हे किसन यादवराव साबळे असुन ते मु/पो- पानेवाडी, ता- घनसांगवी, जिल्हा- जालना येथील होते.