Ahmednagar News : महानगरपालिकेचे सन , २०२३-२४ या आर्थीक वर्षाचे सुमारे १३८७ कोटीचे अंदाजपत्रक (बजेट) स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सोमवारी (दि.२७) महासभेस सादर केले.
महापौर रोहिणी शेंडगे यांनी अंदाजपत्रक स्वीकारत त्यावर अभ्यासासाठी सदस्यांना एक दिवसाचा अवधी देत सभा तहकूब केली. त्यानुससार आता सदरची तबकूब केलेली सभा आता दि.२९ मार्च रोजी होईल, असे महापौर शेंडगे यांनी घोषित केले.
महापालिकेची अंदाजपत्रकीय महासभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी स्थायी समितीची सभा होऊन त्यात शहर विकासाच्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सभापती गणेश कवडे यांनी सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक महासभेत महापौर शेंडगे यांच्याकडे सादर केले.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सदस्य प्रदीप परदेशी, कमल सप्रे, ज्योती गाडे, पल्लवी जाधव, सुवर्णा गेणप्पा, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अति. आयुक्त प्रदीप पठारे, लेखाधिकारी शैलेश मोरे, अनिल लोंढे, सुधाकर भुसारे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे म्हणाले की, मनपा आयुक्तांनी १२४० कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. स्थायी समितीने महानगरपालिकेडून सामान्य नागरिकांच्या गरजेनुसार सुधारणा करून अर्थसंकल्यामध्ये शिफारशी केल्यानुसार बदल करत लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न स्थायी समितीने केला आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ‘पहाता, उत्पन्न वाढविणे देखील गरजेचे आहे.
सर्व सदस्यांचे सहकार्य असल्याने शहराचा सर्वांगीण विकास नक्कीच होणार आहे. महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न व खर्च यांचा मेळ घालून स्थायी समितीने एकूण १३८७ कोटी ७९ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. महानगरपालिकेचे उत्पन्न बाढविण्याकरीता नवीन घरांना घरपट्टी लागु करणे, ज्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची नोंदणी महानगरपालिकेकडे अद्यापपर्यंत झालेली नाही अशा मालमत्ताधारकांना घरपट्टीची आकारणी करणे तसेच सध्या शहराच्या सर्व भागामध्ये उपनगरामध्ये मुख्य रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांनी अनधिक्तरित्या पत्र्याचे गाळे बांधले आहेत.
या सर्वांना घरपट्टी आकारणी करणे, रिव्हिजन करून घरपट्टी आकारणीचे काम करणे, मालमत्ता हस्तांतरण फि, गाळे भाडे, जाहिरात बोर्ड, अनधिकुत बांधकाम नियमित करणे व मालमत्ता धारकांकडून थकीत वसूली करणे, शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी पे अँण्ड पार्किंगची व्यवस्था करणे, अनधिकूत बांधकामांचा शोध घेणे, अनधिकृत नळ कनेक्शन रेग्युलाईज करणे, भाडेतत्वावर दिलेल्या शाळा खोल्यामधील थकबाकीदारांची वसुली करणे तसेच बंद असलेल्या शाळा खाजगीकरणाच्या माध्यमातुन चांगल्या शैक्षणीक संस्थांच्या मागणीनुसार भाडेतत्वावर देणे.
या सर्व कामांकरीता सक्षम अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा नियमीत आढावा घेवून व येणाऱ्या अडचणींचा पाठपुरावा करून महानगरपालिकेचे उत्पन्न कसे वाढेल यावर या आर्थिक वर्षामध्ये भर देण्यात यावा. चितळे रोड येथील नेहरू मार्केटच्या ठिकाणी अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्स व भाजी मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक समोरील जागेत शॉपिंग मॉल उभारणे, सावेडी गावठाण येथील महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर ( एन. सी.सो. कार्या. ), गंजबाजार भाजी मार्केट अत्यंत जुने झाले असून या ठिकाणी भाजी मार्केट व अद्यावत सुवर्ण पेढी (सराफ बाजार ) उभारणे, टि.डी.आर.च्या माध्यमातुन मोक्याच्या जागा विकसीत करणे,
या सर्व कामांकरीता करीता वित्तीय संस्था / बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून किंवा एफ.बी.टी / बी.ओ.टी तत्वावर बांधकाम केल्यास महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीबरोबर शहरातील तरूणांना रोजगार प्राप्त होवून बेरोजगारीचा प्रश्न सुध्दा मार्गी लागणार आहे.
पाणी पुरवठा फेज- २ योजना व केंद्रशासनाच्या अमृत योजना अंतिम टप्यात आली असून, या योजना लवकर मार्गी लागणार आहे. या योजनांमुळे शहराचा पुढील ५० वर्षाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. लवकरच नगर शहराला पुर्ण दाबाने व पुर्ण क्षमतेने पाणी मिळू शकेल, असा आमचा मानस आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये ‘इन्फ्लूएंझा एच ३ एन २’ नव्या विषाणूमुळे महारोगाचा प्रार्दुभाव आपल्या नगरमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महानगरपालिकेने प्रा्दभाव रोखण्याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. या कामाकरीता निधी कमी पडू दिला जाणार नाही.
सध्याच्या युवा पिढीला महापुरूषांच्या पराक्रमांची व आदर्शाची ओळख व्हाबी ब महापुरूषांच्या कार्यातुन प्रेरणा घेवून त्यांच्यावर चांगले संस्कार होण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृूती पुतळा मनपाच्या आवारामध्ये बसविणे,
छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा सावेडी भागातील प्रोफेसर चौक येथे बसविणे, माळीवाडा वेशीत राष्ट्रपुरूष महात्मा ज्योतिबा फुले तर मार्केट यार्ड चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे. ही सर्व कामे आगामी वर्षभराच्या कालावधीत सर्व परवानग्या घेवून बसवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.