नगर शहरात परतीच्या पावसाने लावली 55 मिनिट हजेरी! रस्ते गेले पाण्याखाली तर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उभारलेल्या मंडपामध्ये शिरले पाणी

अहमदनगर शहराच्या दृष्टिकोनातून बघितले तर शहरात काल रात्री साधारणपणे सव्वा सात वाजता पावसाला सुरुवात झाली व 8 वाजून 16 मिनिटांपर्यंत विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.

Ajay Patil
Published:
rain

Ahmednagar News: सध्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. बऱ्याच ठिकाणी काढणीला आलेल्या शेती पिकांचे देखील या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे.

अगदी याच प्रमाणे जर आपण अहमदनगर शहराच्या दृष्टिकोनातून बघितले तर शहरात काल रात्री साधारणपणे सव्वा सात वाजता पावसाला सुरुवात झाली व 8 वाजून 16 मिनिटांपर्यंत विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु झालेल्या या पावसाने मात्र नागरिकांची प्रचंड प्रमाणात तारांबळ उडाल्याचे दिसून आले.नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून त्याकरिता उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाणी शिरले.

इतकेच काय तर नगर शहरांमध्ये रस्त्यांच्या कामाकरिता बऱ्याच ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे व अशा ठिकाणी वाहन चालकांना चालताना आणि वाहने काढताना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. साधारणपणे अजून पुढचे तीन दिवस जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

 परतीच्या पावसाने नगरकरांची उडवली तारांबळ

नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला शहर व परिसरात विजांच्या कडकडाटांसह परतीचा पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्री ७.१५ वाजता शहरात पावसाला सुरुवात झाली. रात्री ८.१६ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

शहरात झालेल्या पावसामुळे विविध भागात नवरात्र उत्सवाची तयारी करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांची धांदल उडाली. दरम्यान, या पावसामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, पुढचे तीन दिवस जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. बुधवारी रात्री मात्र पुन्हा पावसाला सुरुवात झाली.

बुधवारी रात्री ७.१५ वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री ८.१६ वाजेपर्यंत सुरूच होता. सुमारे तासभर चाललेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. या पावसामुळे शहरातील दिल्ली गेट, माळीवाडा, सर्जेपुरा, प्रोफेसर कॉलनी, मध्यनगरासह उपनगरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच नगर शहर व परिसरात हा परतीचा पाऊस झाल्याने नवरात्र उत्सवाची तयारी करणाऱ्या शहरातील विविध देवी मंडळांच्या कार्यकर्त्यांची मात्र धांदल उडाली.

धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू   

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता भीमा नदीतून दौंड पुलात ६,८१०, नांदूर मध्यमेश्वर धरणातील गोदावरी नदीपात्रात ४ हजार ४६९, जायकवाडी धरणात ५ हजार २४०, भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात ८३०, निळवंडे धरणातून ०८०, मुळात धरणातून मुळा नदीत १ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe