Ahmednagar News: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील शेतकरी कुंडलिक जायभाय यांनी एका जमीन खरेदी प्रकरणी 52 लाखांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला असून कुंडलिक जायभाय आज पासून म्हणजेच मंगळवारपासून कर्जत येथे उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये दिलेला असून या प्रकाराबाबत प्रशासनाकडे त्यांनी बऱ्याचदा दाद मागितली परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज पोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने कर्जत तालुक्यातील भांडेवाडी या ठिकाणाच्या गट क्रमांक 510/2 या गट क्रमांकच्या जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली असून या व्यवहारातील 52 लाख रुपयांचा धनादेश कंपनीकडून संबंधित शेतकऱ्याला देण्यात आलेला होता.
परंतु तो वटला नाही व त्यामुळे जमीनही गेली आणि त्या जमिनीचा मोबदला देखील संबंधित शेतकऱ्याला मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्याने आज उपोषणाच्या हत्यार उपसण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
कर्जतच्या शेतकऱ्याचा आमदार रोहित पवारांवर जमीन व्यवहारांमध्ये 52 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने भांडेवाडी (ता. कर्जत) गट क्रमांक ५१०/२ जमीन खरेदीप्रकरणी आर्थिक फसवणूक केली. या व्यवहारातील दिलेल्या ५२ लाख रुपयांचा धनादेशही वटला नाही. त्यामुळे जमीन गेली आणि मोबदलाही मिळाला नाही. या प्रकाराबाबत प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र तेथेही दखल घेतली गेली नाही, असा आरोप दूरगाव (ता. कर्जत) येथील शेतकरी कुंडलिक जायभाय यांनी केला आहे.
तसेच याप्रकरणी आज मंगळवार (दि.१) पासून कर्जत येथे उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना शेतकरी जायभाय म्हणाले, बारामती अॅग्रोचे प्रतिनिधी सुभाष गुळवे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये माझी – समक्ष भेट घेतली.
आ. पवार -यांना कर्जतमध्ये राहण्यासाठी घर बांधायचे आहे. यासाठी तुमच्या मालकीचे भांडेवाडीचे – गट क्रमांक ५१०/२ एकूण ५ एकर पैकी २ एकर क्षेत्र घर बांधणीसाठी पसंत पडलेले आहे. त्यानुसार चर्चेअंती जायभाय यांच्या मालकीचे २ एकर क्षेत्र आ. रोहित पवार यांचे घर बांधण्यासाठी देण्याचे ठरले. उर्वरित ३ एकर जागा संपूर्ण विकसित करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
आ. पवार यांच्यावर विश्वास ठेवत तत्कालीन बाजारभावापेक्षा कमी किमतीने जागेचा व्यवहार ठरला. ही जागा २० ऑक्टोबर २०२१ रोजी बारामती अॅग्रोच्या नावाने करून घेऊ, असे गुळवे यांनी सांगितले.
मात्र, त्या दिवशी खरेदीखत न करता त्यांनी साठेखताचा दस्त करून घेतला. २ एकर जागेचा मोबदला म्हणून ५२ लाख रुपयांचा धनादेश १८ ऑक्टोबर २०२१ रोजी दिला. सदरचा व्यवहार झाल्याच्या दोन दिवसांनी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी ५२ लाख रुपयांचा धनादेश जायभाय यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदनगर या खात्यात भरला.
मात्र हा धनादेश न वटता परत आला. त्यानंतर वारंवार विनंती करूनही जागेचे कोणत्याही प्रकारचे पैसे देण्यात आले नाहीत, असा आरोप जायभाय यांनी केला.तसेच याप्रकरणी कोर्टात दाद मागून कोर्टाने देखील माझी फसवणूक झाल्याचे निरीक्षण नोंदवत मनाई हुकूमाचा आदेश दिलेला आहे.
मात्र, त्यानंतर मला प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्याने आ. पवार यांच्या बारामती अॅग्रोने खोट्या पीक नोंदी लावून माझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आ. पवार यांच्या अन्यायाविरोधात आज कर्जत तहसीलसमोर उपोषण करण्याचा निर्धार शेतकरी यांच्यावतीने अॅड. कृष्ण जायभाय यांनी केला.