Ahmednagar News: शेती व शेतीशी संबंधित जोडधंदयाचा विकास व्हावा व या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते किंवा स्वस्त व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा करण्यात येतो.
जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये किंवा शेतीशी संबंधित असलेल्या जोडधंद्यांमध्ये आवश्यक पायाभूत सोयी सुविधांची उभारणी करता येईल हा त्यामागचा उद्देश आहे.
याच अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेळीपालन व मेंढीपालनाकरिता अनेक योजना राबविण्यात येतात व त्यापैकी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ही एक महत्त्वाची योजना असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेळी व मेंढी गटाकरिता 75 टक्क्यांचे अनुदान देण्यात येते.
शेळी–मेंढी गटाकरिता मिळणार 75 टक्के अनुदान
शेळी, मेंढीपालनासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजना’ राबविली जाते. यात ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर जागा खरेदी तसेच मेंढ्यांसाठी चराई अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान मिळणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेंतर्गत स्थायी व स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोयी-सुविधांसह २० मेंढ्या व एक मेंढा, अशा मेंढी गटाचे वाटप ७५ टक्के अनुदानावर केले जाणार आहे.
या योजनेंतर्गत मेंढी गट वाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या, परंतु ७ स्वतःच्या मेंढ्या आहेत, अशा प लाभार्थ्यांना देखील योजनेतील स घटकांचा लाभ घेता येणार आहे.
सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढी पालनाच्या पायाभूत सोयी- सुविधांसाठी ७५ टक्के अनुदान, देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, चाऱ्याचा मुरघास बनवण्यासाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाना बनवण्यासाठी ही ५० टक्के अनुदान संतुलित आहार उपलब्ध करून मिळते.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना काय आहे?
राज्यामध्ये अर्ध बंदिस्त व बंदिस्त मेंढी पाल व्यवसायाला चालना देणे, मेंढी पालनाच्या पारंपरिक व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, स्थायी तसेच स्थलांतरितांना मेंढी पालन या व्यवसायापासून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे, भटक्या जमाती व धनग समाज बांधवांच्या जीवनमान उंचावून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आहे.
कोणते कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, रेशन कार्ड, बैंक पासबुक, जातीचा दाखला, अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, मेंढी पालन पद्धती व मेंढ्यांच्या संख्येबाबत पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी अधिकायांचे प्रमाणपत्र, बंधपत्र स्वरूपातील अपत्य स्वयंघोषणापत्र, स्वयंघोषणा पत्र आदी कागदपत्रे लागतात.
कोणाला मिळते ७५ टक्के अनुदान
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीसाठी ही योजना आहे. १८ ते ६० वयोगटातील इच्छुक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लाभ घ्यावा, अशी आवाहन पशुसंवर्धन विभागाने केली आहे.