अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण होऊन आज हिवरे बाजार गावाचे कोविड -१९ लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले. (A village in where all citizens have been vaccinated)

एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस

मतदार यादीनुसार हिवरे बाजार मधील वय वर्षे १८ च्या पुढील एकूण ८९७ व्यक्ती लसीकरणासाठी पात्र होत्या.संपूर्ण व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले.

पारनेर तालुक्यातील पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथे १०० टक्के लसीकरण यशस्वीपणे पार पडले.

याप्रसंगी मा.श्रीनिवास अर्जुन उपविभागीय अधिकारी भाग नगर यांनी हिवरे बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांशी समक्ष चर्चा केली.

घरी जाऊन लसीकरण !

मा.डॉ.संदीप सांगळे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनीही लसीकरण बाबत भेट देऊन कोविड -१९ लसीकरण बाबत मार्गदर्शन केले तसेच मा.श्री.उमेश पाटील तहसीलदार नगर यांनी

एकत्रित लसीकरण कामकाजाचा आढावा घेतला आणि ज्या व्यक्ती अपंग किंवा जास्त वय झालेले असेल अशा व्यक्ती लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ शकत नाही अशा व्यक्तीच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.

यासाठी विशेष सहकार्य व समन्वयाची भूमिका डॉ.शिवानी देशपांडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरे बाजार व त्यांचे सर्व सहकारी तसेच डॉ.दुर्गा बेरड प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगाव,संतोष पाखरे तलाठी,सौ.विमल ठाणगे सरपंच हिवरे बाजार यांचे लाभले.