अहमदनगर जिल्ह्यातील केडगावातील महिलेची 1 कोटी 70 लाखांनी फसवणूक! महिलेच्या नावावर कर्ज काढून व्यावसायिकांनी केली फसवणूक

अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील एका महिलेची तब्बल एक कोटी सत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. या महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून एक कोटी सत्तर लाख रुपयांचे कर्ज काढले व त्या कर्जाची परतफेड केली नाही.

Ajay Patil
Published:
crime news

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील एका महिलेची तब्बल एक कोटी सत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. या महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून एक कोटी सत्तर लाख रुपयांचे कर्ज काढले व त्या कर्जाची परतफेड केली नाही.

हे कर्ज 21 फेब्रुवारी 2015 रोजी अशोका बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतून करण्यात आलेले होते. परंतु त्या कर्जाची संबंधितांनी अजून पर्यंत परतफेड केली नसल्यामुळे शाहूनगर केडगाव येथील सविता भानुदास कोतकर यांनी सहा जणांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील महिलेची 1.70 कोटींची फसवणूक

केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून १ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज काढले. ते कर्ज परत न भरता त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सविता भानुदास कोतकर (वय ४८ रा. लक्ष्मी निवास, शाहुनगर, केडगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (१ ऑक्टोबर) दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिक मयूर वसंतलाल शेटिया (वय ४७ रा. भूषणनगर, केडगाव), संदीप वालचंद सुराणा (वय ४२ रा. चास ता. नगर), सीए विजय मर्दा (वय ६२), गणेश दत्तात्रय रासकर (वय ४६, दोघे रा. धाडीवाल कॉम्प्लेक्स, एस.टी.स्टॅण्ड समोर, नगर), अशोक सहकारी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेचा शाखाधिकारी अभय निघोजकर (वय ५४), व्यावसायिक सागर कटारीया (वय ४३ रा. भुषणनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मयुर शेटीया व इतरांनी सविता कोतकर यांच्या नावावर २१ फेब्रुवारी २०१५ रोजी अशोक बँकेच्या मार्केटयार्ड शाखेतून १.७० कोटी रूपयांचे कर्ज काढले. यातील एक कोटी ५० लाख रूपयांची रक्कम फिर्यादीच्या चालू खात्यावर जमा झाली होती.

कोणतेही देणे नसतानाही त्यातील ११ लाख १५ हजार रूपये मयूर शेटिया याच्या सम्यक ट्रेडर्स नावाने दिले गेले. तसेच संदीप सुराणा याने एक कोटी ३१ लाख २० हजार रुपये काढून घेतले. महिलेचे पती तुरूंगात असताना सीए मर्दाच्या सांगण्यावरून डिसेंबर २०१८ मध्ये गणेश रासकर याने इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली, चालू खात्याचे चेक बुक घेण्यासाठी कोऱ्या कागदावर फिर्यादीच्या सह्या घेतल्या.

चेक बुक आल्यावर पाच कोऱ्या चेकवर सह्या घेऊन त्याचा गैरवापर केला. दरम्यान, या प्रकरणात बँकेचा मार्केटयार्ड शाखाधिकारी निघोजकर याने इतर संशयित आरोपींना मदत केली. फिर्यादीचे कर्ज खाते एनपीएमध्ये असताना कर्ज खात्यात जाणून बुजून रक्कमा जमा न करता त्या चालू खात्यात जाम केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe