अहमदनगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आल्यास अभिषेक कळमकर राहतील उमेदवार? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे संकेत

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना म्हटले की, अहमदनगर शहर मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात जर राष्ट्रवादीकडे आला तर पक्षाचा उमेदवार हा सर्व परिचित असेल व या निमित्ताने त्यांनी अभिषेक कळमकर यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत.

jayant patil

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून सध्या ही यात्रा नगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर येथे 27 सप्टेंबर रोजी शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली व यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना म्हटले की, अहमदनगर शहर मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात जर राष्ट्रवादीकडे आला तर पक्षाचा उमेदवार हा सर्व परिचित असेल व या निमित्ताने त्यांनी अभिषेक कळमकर यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत.

 नगर शहरातून अभिषेक कळमकर यांना उमेदवारीचे जयंत पाटील यांचे संकेत

नगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आल्यास पक्षाचा उमेदवार हा सर्वपरिचित, असेल असे अभिषेक कळमकर यांच्याकडे कटाक्ष टाकून त्यांच्या उमेदवारीचे संकेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.शरद पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेची सभा शुक्रवार (दि.२७) नगरमध्ये पार पडली. या वेळी जयंत पाटील यांनी हे संकेत दिले.

महाआघाडीचे जागा वाटप व्हायचे आहे, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आल्यास उमेदवार तुम्हाला परिचित असलेला दिला जाईल. खासदार निलेश लंके यांनी मिळवलेला मोठा विजय हा सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा असून, त्यांच्या कार्याची जनतेशी असलेले नाळ यातून प्रतिबिंबित झाली. शरद पवार यांना मानणारा नगर शहरात मोठा वर्ग आहे.

सर्व पदे घरात असूनही शहराचा विकास झाला नाही. मला नगर शहराला मोठे करायचे असून, स्वतः मोठे होण्यासाठी नाही. शहरात सध्या मोठे जाहिरात फलक लावले जात आहेत, अशा जाहिरातींची आम्हाला गरज नाही.

माझ्या डोक्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात आहे. तसेच चंद्रकांत पाटील व खासदार नीलेश लंके यांची साथ आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे. नगर शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, त्याला विजयी करण्यासाठी आणि त्यातून काम करू, अशी ग्वाही या वेळी अभिषेक कळमकर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe