शनीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एजंट्सचा त्रास; पोलिसांनी दाखविला खाक्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आले होते. अखेर दिवाळीनंतर हे धार्मिक स्थळे खुली करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यातील शिणशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असत.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कामशिन एजंटकडून लुटण्याचे कामे पुन्हा एकदा सुरु झाले आहे. नुकतेच शनिदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे वाहन अडवून

त्यांना ठराविक दुकानावरूनच पुजासाहित्य घेण्याची सक्ती करत दमदाटी करत असलेल्या दोन कमिशन एजंटांवर (लटकू) शनिशिंगणापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली.

नुकतेच मंदिरे खुली करण्यात आली आहे. देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत आहे. मात्र एजंटच्या या वाढत्या त्रासाच्या तक्रारीनंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी सोनई व घोडेगाव रस्त्यावर गस्त घालत लटकूंना सळो की पळो केले.

वैष्णवी हॉटेलसमोर व कुर्‍हाट पार्किंगसमोर भाविकांची अडवणूक करत असलेल्या सुमीत बबन शिंदे (वय 20) व रमेश सुखदेव फुलारे (वय 25) दोघेही रा. सोनई यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान पोलीस पथकाने रस्त्यावर व गावात गस्त घालत कारवाईचा धडाका लावला. या कारवाईने काल दिवसभर भाविकांची अडवणूक कमी प्रमाणात झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment