Ahmedanagar News : उष्णतेच्या लाटेचा इशारा ! अहमदनगरचा पारा ३८ अंशावर, सर्वाधीक तापमान असणाऱ्या शहरांत तिसऱ्या स्थानावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather News : सध्या वातावरण चांगलेच उष्ण व्हायला लागले आहे. उन्हाचा चटका जसजसा वाढत आहे तसतशी उष्णतेची काहिली वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. अहमदनगरचा पारा ३८ अंशावर गेला आहे. सध्या मार्च महिना संपून एप्रिल सुरु झाला आहे. अजून मे महिना तोंडावर आहे. त्यामुळे उष्णतेची काहिली आणखी वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हवामान विभागाने अनेक ठिकाणी ५ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असल्याने तापमान वाढू शकते असा अंदाज आहे. चंद्रपूर मध्ये सर्वाधिक ४१ अंश सेल्सियस तापमान असून अकोल्यात ३९ अंश सेल्सियस तापमान आहे. त्या खालोखाल अहमदनगरचे तापमान ३८ अंश आहे. हवामानाबाबत माहिती देणाऱ्या एका वेबसाईटवर तापमानासंदर्भात माहिती देण्यात आली असून यावर तापमानाची नोंद वेळेनुसार सतत बदलत असते हे देखील लक्षात घ्यावे लागेल. आपण याठिकाणी कोणत्या जिल्ह्यात किती तापमान आहे ते पाहुयात..

तापमानावर एक नजर..(तापमान अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई – ३१ , नवी मुंबई – ३१, ठाणे – ३४, पुणे – ३५, पिंपरी चिंचवड – ३६, अहमदनगर – ३८, सोलापूर – ३८, अमरावती – ३८ , नागपूर मध्ये ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालेली आहे. तसेच अंधेरी पूर्व – ३१, अंधेरी पश्चिम – ३१, भांडुप पूर्व – ३१, भिवंडी – ३३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालेली आहे.

उष्णतेच्या लाटेचा परिणाम
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात उष्णता जास्त असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.