Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील प्रसिद्ध वकील पती पत्नीचा निर्घृण खून ! आधी अपहरण केले, नंतर खून करून मृतदेह विहिरीत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. आता या वकील दाम्पत्याचे मृतदेह राहुरी तालुक्यातील उमरे येथील एका विहिरीमध्ये आढळून आले. राहुरी तालुक्यामध्ये 25 जानेवारी 2024 रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव असे हत्या झालेल्या वकील दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघे मानोरी येथील रहिवासी असून दोघे राहुरी येथील न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करत होते.

25 जानेवारी रोजी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयामध्ये होते. दोनच्या दरम्यान ते अहमदनगर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांनी त्यांच्या पत्नी मनीषा यांना आणण्यास पाठवले होते अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान त्यातंर हे दाम्पत्य बेपत्ता झाले होते. २६ जानेवारी रोजी पहाटे दोनच्या दरम्यान ऍडव्होकेट राजाराम आढाव यांची चार चाकी गाडी ही राहुरी शहरामधील न्यायालय परिसरामध्ये आढळून आली होती.

पोलीस पथक गाडीच्या जवळ पोहोचले, त्यावेळी तिथे आढाव यांच्या गाडीच्या जवळ दुसरी एक डस्टर गाडी उभी होती. मात्र पोलिसांची गाडी आलेली पाहताच ती गाडी वेगामध्ये निघून गेली.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आढाव यांची चार चाकी गाडी ताब्यात घेत तपासणी केली. त्यामध्ये एक हात मोजा दोर आणि एक बूट आढळून आला होता. आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आय सी आय सी आय बँकेसमोर बेवारस आढळून आले होते.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आढाव दाम्पत्याचा शोध सुरु केला.जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक होणे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सदर डस्टर गाडीचा शोध घेतला. व त्या आधारे किरण आणि आणखी एक असे दोघे ताब्यात घेतले.

असा केला खून
वरील दोन्ही आरोपींकडे पोलिसांनी विचारपूस केली. त्यांनी सुरवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली. 25 जानेवारी रोजी दांपत्याचे अपहरण करून त्यांना मनोरी येथील घरी घेऊन गेले. रात्री त्यांचा खून करून त्यांचे मृतदेह दगड बांधून स्मशानभूमी जवळील विहिरीत टाकून दिले अशी माहिती या दोन्ही आरोपींनी दिली.