अहमदनगर ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट अहमदनगरचे ‘हे’ मंत्री !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध कारवाईसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे.

भाजपचे नेते किरीट सोमया यासंबंधी पुण्याला आले आहेत. सायंकाळी ते येथे संबंधित कार्यालयांना भेटी देणार आहेत. मात्र, पुण्याच्या वाटेवर असतानाच त्यांनी ट्विट करून मुश्रीफ यांच्यासंबंधी केंद्र सरकारने जे पाऊल उचलेले त्याची माहिती दिली आहे.

सोमय्या यांनी म्हटले आहे की, मंत्री हसन मुश्रीफ यांचे कुटुंब आणि सेनापती संताजी घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

फसवणूक, शेल आणि बनावट कंपन्यासाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपासासाठी कलम २५६ अन्वये कारवाईची मागणी केली आहे.

त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. सोमय्या पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे सायंकाळी ४.३० वाजता पुण्यात आयकर आयुक्त इंवेस्टीगेशन, आयकर सदन, सॅलिसबरी पार्क येथे तर सायंकाळी ५.३० वाजता रजिस्ट्रार ऑफ कंपनीस, ग्रीन बिल्डिंग, आकुर्डी येथे ते भेटी देणार आहेत.