अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघे ठार, तिघे जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- अहमदनगर- मनमाड रोडवरील देहरे (ता. नगर) शिवारात आज पहाटे दीड वाजता भीषण अपघात झाला. कंटेनरमधून वाहतूक केले जाणारे पवनचक्कीचे पाते जीपवर कोसळले.

यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले. सुशीला विलास रासकर, शाम बाळासाहेब रासकर (दोघे रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) असे मयत व्यक्तीचे नावे आहेत.

अपघातात तिघे जखमी झाले आहेत. विलास अविनाश रासकर, आनंद विलास रासकर व शिल्पा शाम रासकर (सर्व रा. खंडाळा) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत व जखमी हे बोलेरो जीपमधून देवदर्शनाला जात असताना अहमदनगर- मनमाड रोडवरील देहरे शिवारात त्यांच्या जीपवर पवनचक्कीचे पाते पडले.

यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.