अहमदनगर, नासिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन ! ‘या’ प्रकल्पास 1498 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शेतीसाठी पाण्याची निकड लक्षात घेता शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. आता नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी 1498 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता बहाल झाली आहे.

यामुळे अहमदनगर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शासनाकडून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मांजरपाड्यासह (देवसाने) वळण योजनांच्या कामांना मोठे गती मिळणार आहे.

या प्रशासकीय मान्यतेनुसार ५८०.८८ कोटी रुपयांची पुणेगाव दरसवाडीसह ओझरखेड, पालखेड कालव्यांची कामे पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिन्यांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चतुर्थ प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.

यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या बऱ्याच अंशी दूर होण्यास मदत होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, उर्ध्व गोदावरी प्रकल्प हा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण व आदिवासी क्षेत्रातील आहे.

हा प्रकल्प गोदावरी नदीच्या उपनद्यांवर उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नासिक अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असते.

आता या प्रकल्पाला सुधारित 1498 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ हजार २१० हेक्टर सिंचन क्षेत्रास याचा लाभ मिळणार असून संबंधित शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान पाहायला मिळत आहे.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव अशा ६ प्रकल्पांचा समावेश असून आता या प्रशासकीय मान्यतेचा या प्रकल्पास मोठा फायदा होणार आहे.