Ahmednagar News : नियमबाह्य पद्धतीने महामार्गाची कामे सुरु, वृद्धाच्या अपघातानंतर युवासेना उपजिल्हाप्रमुख कांडके आक्रमक

Ajay Patil
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने महामार्गांचे काम सुरु आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप अहमदनगर जिल्ह्याचे युवासेना उपजिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके यांनी केला आहे.

नगर तालुक्यातील कौडगाव या ठिकाणी मंगळवारी (दि. 28 मे) महामार्गावरील साईडपट्टा भरण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी कोणतेही दिशादर्शक फलक लावले नव्हते व वाहनांना सूचित करण्यासाठी कर्मचारी उपस्थित नव्हते. रस्त्यावर मध्येच दगड ठेवून तिला दोरी बांधून पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम सुरू होते.

यावेळी अचानक समोर आलेल्या दगडाचा अंदाज न आल्याने दुचाकी दगडावर गेल्याने आसाराम परदेशी यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली यावेळी महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलवत रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी पाठवले.

यावेळी नियमबाह्य कामासंदर्भात महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांनी महामार्ग प्रशासना विषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी बाबासाहेब मदगे, रावसाहेब पोतकुले, आत्माराम इंगूले आदींनी अपघात स्थळी मदत केली.

तीव्र आंदोलनाचा इशारा
अ.नगर- विशाखापट्टणम महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे व नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कामाने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

तरीही महामार्ग प्रशासनाला जाग येत नाही. अपघातानंतर प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. यापुढील काळात हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सोमनाथ कांडके, युवासेना उपजिल्हाप्रमुख, अहमदनगर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe