Ahmednagar News : प्रवरेने घेतला आणखी एक बळी, विद्यार्थ्यास बुडताना पाहून भेलेल्या मित्रांची नदीबाहेर धूम, चार तास शोधकार्य

Ajay Patil
Published:
pravara

Ahmednagar News : कोल्हार येथील प्रवरा नदीपात्रात तीन मित्र पोहायला गेले. मात्र त्यातील १५ वर्षाच्या एका शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व आपत्ती दलाचे जवान यांच्या अथक प्रयत्नानंतर सुमारे चार तासांनी मृतदेह नदीपात्राच्या कपारीत मिळून आला.

कोल्हार येथील प्रवरा नदी पात्रात विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता यातील भगवतीपूर येथील अविनाश पाराजी जोगदंड, वय १५ या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. प्रवरा नदीत पात्रात वाळूउपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी पत्रात मोठमोठे खड्डे पडले असल्याने त्या वाळूत अडकल्याने त्याचा मृतदेह सापडण्यास उशीर लागला.

दरम्यान, मृत अविनाश जोगदंड हा त्याच्या मावशीकडे शिकण्यासाठी आला होता. भगवतीपूर येथील निर्मलनगर येथे तो मावशीकडे राहत होता. राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक च येथे बेलापूर रस्त्याला बागमळ्याजवळ असलेल्या प्रवरा नदीमध्ये भगवतीपूर परिसरातील तीन शालेय विद्यार्थी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते.

यापैकी अविनाश जोगदंड याने अंगातील कपडे काढून नदीपात्रात पोहण्यासाठी घेतली. परंतु मोठमोठ्या खड्या, अंदाज न आल्याने तो जागीच बुडत होता. हे पाहून त्याचे मित्र गणेश रावण वक्ते व शुभम चौरसिया या मुलांनी नदीबाहेर येऊन धूम ठोकली. घटनेची माहिती वाऱ्यासारखे पसारताच कोल्हार भगवतीपूरमधील ग्रामस्थांनी तोबा गर्दी केलेली होती.

लोणी पोलिस स्टेशनला घटनेची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक आशिष चौधरी व त्यांच्या सहकार्याची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्यास मदत करण्याचे काम सुरू केले. यावेळी राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी येथील अग्निमशन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. १५ जणांच्या पथकाने चार तासानंतर मृतदेह शोधून काढला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News