मुहूर्त सापडला ! शिंदे सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाला दिली मंजुरी ; जिल्ह्यातील दक्षिण भागाचा चेहरा-मोहरा बदलणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. उजनी धरणावरून जामखेडची नळ पाणीपुरवठा योजना व मल निसारण योजनेला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि कर्जत तालुक्यासाठी अति महत्त्वाचा तुकाई उपसा सिंचन प्रकल्प देखील लवकरच सुरू होणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की एकनाथ शिंदे यांनी तुकाई उपसा सिंचन प्रकल्पाबाबत तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबतची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे.

याची अधिक माहिती अशी की, काल एक डिसेंबर रोजी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत आणि जामखेड तालुक्यातील भाजपाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री आवासावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांसाठी मोठ गिफ्ट दिल आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले जामखेड शहर पाणीपुरवठा योजना व मलनिसारण योजनेला मंजुरी दिली आहे.

यासोबतच कर्जत तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्याची क्षमता असलेला तुकाई उपसा सिंचन प्रकल्प सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक धोरण अंगीकारले असून लवकरच प्रकल्प सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

याबाबत राम शिंदे यांनी गत महाविकास आघाडी सरकारने मुद्दामहून ह्या योजना प्रलंबित ठेवल्याचा आरोप लगावला आहे. तसेच कर्जत आणि जामखेडसाठी अति महत्त्वाच्या असणाऱ्या या दोन योजना पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला असल्याचे राम शिंदे यांनी नमूद केले आहे.