नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणातील आरोपी विवेक कोल्हे यांच्या निकटचे? राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्षांनी दाखवले फोटो

आशुतोष काळे यांच्या गटाकडून देखील विवेक कोल्हे यांच्या आरोपांना प्रतिउत्तर देण्यात आलेले असून कोल्हे यांनी उपस्थित केलेले सगळे मुद्दे खोडून काढण्यात येत आहेत. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव व कोपरगाव शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषद घेत या गोळीबार प्रकरणातील आरोपीचे कोल्हे यांच्या सोबतचे फोटो दाखवले.

Ajay Patil
Published:
vivek kolhe

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये सध्या आमदार आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचे दिसून येत असून अनेक मुद्द्यांना धरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. नुकताच कोपरगाव शहरामध्ये गोळीबार प्रकरण घडले होते व या प्रकरणी विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी विविध मुद्द्यांना धरून अनेक आरोप केले होते.

परंतु आता आशुतोष काळे यांच्या गटाकडून देखील विवेक कोल्हे यांच्या आरोपांना प्रतिउत्तर देण्यात आलेले असून कोल्हे यांनी उपस्थित केलेले सगळे मुद्दे खोडून काढण्यात येत आहेत. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव व कोपरगाव शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषद घेत या गोळीबार प्रकरणातील आरोपीचे कोल्हे यांच्या सोबतचे फोटो दाखवले.

 कोपरगाव शहरातील गोळीबारातील आरोपी विवेक कोल्हे यांचे निकटवर्तीयराष्ट्रवादीने दाखवले आरोपी समवेतचे  फोटो

शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार आशुतोष काळे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काळे परिवाराने आजपर्यंत कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला नाही. मात्र, घटनेतील आरोपींचे विवेक कोल्हे यांच्याशी निकटचे संबंध आहेत, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगत आरोपीचे कोल्हे यांच्या समवेतचे फोटो दाखवले.

कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात शनिवार (दि. २८) रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, कोपरगाव शहराचा विकास झाला. पाणी प्रश्न सुटला. नागरिकांना तीन दिवसांआड पाणी मिळणार, या भीतीने घाबरलेल्या विरोधकांनी आमदार काळे यांच्यावर चुकीचे आरोप करून गुन्हेगारी लोकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या गोळीबारातील आरोपीचे विवेक कोल्हे यांच्यासमवेत असलेले फोटो तसेच ज्याच्यावर गोळीबार झाला, त्या दुसऱ्या आरोपीचा २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचार करताना, जो आरोपी कोल्हेंचा कार्यकर्ता आहे, त्या आरोपीचे कोल्हे यांच्या सोबतचे फोटो गंगुले यांनी दाखविले.

यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी रेशन व अवैध धंदे यांच्याबाबत करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे सांगितले. यापुढे अशा पद्धतीने चुकीची बदनामी केली तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा आढाव यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe