Ahmednagar News: सरकारच्या माध्यमातून 2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचे जे काही नुकसान झाले होते त्या नुकसानी पोटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता. परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सरकारच्या माध्यमातून या अनुदानासाठी तारीख पे तारीख देणे सुरू होते व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण पसरले होते.
मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा होती व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून शासनाने या अनुदानासाठी लागणाऱ्या निधी वितरणास नुकतीच मंजुरी दिली व कालपासून या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 15 कोटी 62 लाख रुपयांचे अनुदान मिळणार असून ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून देण्यात आली.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले 15. 62 कोटी रुपये कापूस सोयाबीन अनुदान
२०२३ च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १५.६२ कोटी रुपये अनुदान मिळणार असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी ही माहिती दिली. २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी महायुती शासनाने हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
कोपरगावात ३८ हजार २०५ सोयाबीन उत्पादक, तर ३ हजार ३३० कापूस उत्पादकांना हे अनुदान मिळणार आहेत. सोयाबीन व कपाशी पिकासाठी हेक्टरी ५ हजार व जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
सोयाबीन व कापूस अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही, त्यांनी तातडीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कृषी सहाय्यकांशी संपर्क करावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.