Ahmednagar News: राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा पडघम वाजू लागला आहे.सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना आपल्याला दिसून येत आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली असून कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत सगळेच मंडळी आता विधानसभेच्या कामकाजात व्यस्त असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विकास कामांचा धडाका किंवा भूमिपूजनाचे कार्यक्रम देखील होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील राजकारण पाहिले तर ते प्रामुख्याने सध्या आमदार आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांच्या भोवती फिरताना दिसून येत आहे.
काळे आणि कोल्हे हे एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसून येत नाहीयेत. नुकतेच विवेक कोल्हे यांनी विकास कामांच्या बाबतीत आमदार आशुतोष काळे यांच्यावर टीका केलेली होती व त्या टीकेला आशुतोष काळे यांच्या माध्यमातून देखील जशास तसे उत्तर दिले जात आहे.
नुकतीच कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते व त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला व या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत म्हटले की, ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या व्यक्तीला सगळेच पिवळ दिसते, अगदी त्याचप्रमाणे काहीशी परिस्थिती विरोधकांची झाली असून त्यांना विकास दिसत नाही.
आ.आशुतोष काळे यांनी विरोधकांवर केली टीका
ज्याप्रमाणे एखाद्याला कावीळ झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसते, अशीच काहीशी परिस्थिती ज्यांना विकास दिसत नाही त्या विरोधकांची झाली आहे. अशी टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली. कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार काळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
ते म्हणाले की, कुठेतरी काहीतरी चुकीचे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करायची असा प्रकार विरोधकांकडून सुरु आहे, मात्र जनता समजदार आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तहसील कार्यालय बांधले.
तेथे फर्निचरसाठी विरोधकांना त्यांच्या कार्यकाळात निधी आणता आला नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना या तहसील कार्यालयात बसण्यासाठी व्यवस्था त्यांना करता आली नाही.
त्यासाठी मी स्वतः आमदार नसताना नागरिकांना बसण्यासाठी तहसील कार्यालयाला बाकडे दिले व २०१९ ला निवडून आल्यानंतर फर्निचरसाठी जवळपास १.९३ कोटी निधी मी दिला आहे, त्यामुळे त्यांनी विकासावर बोलू नये असेही काळे म्हणाले.
पाच वर्षात झालेला विकास जनतेला दिसतो आहे. मात्र ज्याप्रमाणे ज्यांना कावीळ झाली त्यांना सगळंच पिवळं दिसते, ज्यांना विकास करता आला नाही त्यांना विकास देखील दिसत नाही. त्यांना लवकर विकासाची दृष्टी यावी व मतदार संघाचा विकास दिसावा यासाठी नागरिकांनी प्रार्थना करावी असेही आमदार काळे यांनी म्हटले आहे .