Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी आमदार आशुतोष काळे यांचा जोरात प्रचार सुरू असून या मतदारसंघातील ग्रामीण भागातच नाही तर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे व शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याचे दिसून येत आहे. अगदी याप्रकारे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरामध्ये प्रचार फेरीचे सोमवारी आयोजन केलेले होते. या प्रचार फेरीमध्ये महायुतीचे पदाधिकारी व त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे कटआउट हातात घेऊन त्यावर लिहिलेले ‘आमच्या ठरलंय’ हे घोषवाक्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला विकासाची जी काही आश्वासने दिली होती त्यापैकी बरीच आश्वासने पूर्ण झाली आहेत व राहिलेली कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात व शहरातील प्रत्येक प्रभागात आमदार आशुतोष काळे यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
आयोजित प्रचार फेरीमध्ये त्यांनी म्हटले की, निवडणुकीत जनतेने असा आशीर्वाद द्यावा की मताधिक्यांचे रेकॉर्ड ब्रेक झाले पाहिजे. त्यानंतर मात्र विकासाचा कोणताही प्रश्न या मतदारसंघात शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची ग्वाही देखील त्यांनी या निमित्ताने दिली.
आशुतोष काळे यांची प्रचार फेरी
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरामध्ये सोमवारी प्रचारफेरीचे आयोजन केले होते व या फेरीमध्ये महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. या प्रचारफेरी दरम्यान बोलताना आशुतोष काळे यांनी म्हटले की जनतेला गेल्यावेळी विकासाची जी आश्वासने दिली होती त्यापैकी बरीच आश्वासने पूर्ण केली असून काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
या निवडणुकीत जनतेने असा आशीर्वाद द्यावा की मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक झाले पाहिजे. त्यानंतर मात्र या मतदारसंघात कोणताही विकासाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही. ही प्रचार फेरी संपर्क कार्यालयापासून सुरुवात झाली व नंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदिमा पुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून आमदार काळे यांनी अभिवादन केले.
या प्रचार फेरी दरम्यान शहरातील आठवडे बाजारामध्ये आमदार आशुतोष काळे गेले व त्या ठिकाणी व्यापारी तसेच नागरिक व शेतकऱ्यांची भेट घेतली व मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना काळे यांनी म्हटले की, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवला आहे. मतदारसंघातील रस्त्यांचे जे काही प्रश्न होते ते देखील बऱ्याचपैकी सुटले असून भविष्यात सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे उभारायचे आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगती पथावर असून त्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.
तसेच सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी विकासाची जबाबदारी पार पाडत असून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. रस्ते तसेच पाणी व वीज, आरोग्य सारखे मूलभूत प्रश्न मार्गी लागले असून केलेल्या विकासकामांना जनतेसमोर घेऊन मी आता जात आहे. त्यामध्ये धनशक्ती वगैरे काही नसून निव्वळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले.