Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्‍य सिद्धाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.यावेळी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्‍कार केला.