शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रथयात्रेला अखेर परवानगी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ यात्रा रद्द करण्यात आली होती.

यामुळे झालेली भक्तांची नाराजी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटीवर रथयात्रेला परवानगी दिली आहे.

करोनाचे प्रमाण कमी झाल्याने शिर्डीतील साई दर्शनासाठीचे नियम आणखी शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र, विविध सण-उत्सव आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी २२ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले.

त्यामुळे शिर्डीतील गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्‍ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक स्‍थगित करण्‍यात आली होती. यावरून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी जिल्‍हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्‍याशी यासंबंधी चर्चा केली. रथयात्रेला परवानगी देण्याची मागणी केली.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. आता २२ मार्चला सायंकाळी ५ वाजता शिर्डीतून रथयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सहकार्य करणार आहे. तर रथयात्रेसाठी पोलिसांचा वाढीव बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.