अहमदनगर : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर ! सर्वसामान्य शेतकरी पण लढणार ; ‘या’ तारखेला वाजणार निवडणुकीचा बिगुल

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत एक महत्त्वाच अपडेट हत्या आला आहे. खरं पाहता या बाजार समितीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेणे आवश्यक होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला एपीएमसीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेशित केले होते. मात्र जसं की आपणास ठाऊकच आहे राज्य शासनाने बाजार समिती निवडणूक कायद्यामध्ये धोरणात्मक बदल घडवून आणला आहे.

राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार आता बाजार समितीची निवडणूक सर्वसामान्य शेतकरी देखील लढू शकणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडून संबंधित कायद्यात विधिवत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकरी बांधवांना निवडणूक लढवता यावी या अनुषंगाने बाजार समितीची होउ घातलेली निवडणूक विहित कालावधीमध्ये करता येणे अशक्य आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने एडवोकेट विठ्ठल दिघे यांनी उच्च न्यायालयात अर्ज सादर करून राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन कायद्यामुळे विहित कालावधीत म्हणजेच 30 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक घेता येणे अशक्य असल्याचे सांगितले. निवडणूक घेण्यासाठी आणि नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा व्यवस्थित अभ्यास करून निवडणूक प्रक्रियेत बदल करावा लागणार आहे.

अशा परिस्थितीत निवडणूक घेण्यासाठी मुदत वाढ दिली जावी अशी मागणी उच्च न्यायालयात विठ्ठल दिघे यांनी केली. या संदर्भात सरकारी वकील एडवोकेट डी आर काळे यांनी देखील उच्च न्यायालयात राज्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरू असल्याने सदर एपीएमसीच्या निवडणुकीसाठी मुदत वाढवून द्यावी असा युक्तिवाद केला. 

सदर युक्तिवाद माननीय न्यायालयाने मान्य करून 15 मार्चपर्यंत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक घेतली जावी असा आदेश शेजारी केला आहे. म्हणजेच आता निवडणूक लढवण्यासाठी 15 मार्चपर्यंतचा कालावधी प्राधिकरणाला देण्यात आला आहे. अर्थातच या तारखेच्या आधी प्राधिकरणाला निवडणूक लढवणे बंधनकारक राहणार आहे.

Advertisement

एकंदरीत राज्य शासनाने बाजार समिती निवडणूक कायद्यात बदल करून व सामान्य शेतकरी बांधवांना निवडणूकित उभा राहण्याची मुभा दिली असल्याने श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला 30 नोव्हेंबर ऐवजी 15 मार्चपर्यंत निवडणूक घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

साहजिकच आता सर्वसामान्य शेतकरी बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार असल्याने श्रीरामपूर एपीएमसी मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सामान्य शेतकरी देखील निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यामुळे श्रीरामपूर एपीएमसी मधील निवडणुकीची ही लढत चांगलीच रंगणार आहे. 

Advertisement