Ahmednagar Politics : अखेर खासदार सुजय विखे पाटलांचा यू टर्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics :-  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यात तालुक्यात पक्षविरहित आघाड्या होऊन निवडणूक झाल्याने जनताच कन्फ्यूज झाली असल्याने सभापती निवडीत कुणीही सभापती झाला तरी काम करणारा अध्यक्ष व्हावा, अशी अपेक्षा असल्याचे मत खा. सुजय विखे यांनी श्रीगोंदा दौऱ्यावर असताना व्यक्त करत सभापती निवडीत लक्ष घातले नसल्याचे सांगत यू टर्न घेतला आहे.

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीनंतर नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता कोणाचीही आली असली तरी सभापती हा भाजपचाच होणार, असे वक्तव्य केल्याने तालुक्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

खा. विखे यांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा केला. या वेळी बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर यू टर्न घेत श्रीगोंदा तालुक्यात पक्षविरहित आघाड्या होऊन निवडणूक झाल्याने

जनताच कन्फ्यूज झाली असल्याचे सांगत सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत माझा कसलाही सक्रिय सहभाग नसल्याने सभापती कुणीही झाले तरी काम करणारा व्हावा, अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.

या वेळी आण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब गिरमकर, सिध्देश्वर देशमुख, अजीत जामदार, अमित लगड, ज्ञानेश्वर विखे, उपस्थित होते