Ahmednagar Politics : बाजार समित्‍या बंद ठेवून शेतक-यांना देशोधडीला लावले तेच आता आम्‍हाला येवून शहानपणा शिकवित आहेत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माजी महसुलमंत्र्यांनी पंधरा वर्षात केली नाहीत तेवढी काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महिन्‍यातच करुन दाखविली. यामागे त्‍यांची समाजाला न्‍याय देण्‍याचीच भूमिका राहीली. आजीमाजी महसूल मंत्र्यांच्‍या कामाची तुलना आता समाजातील प्रत्येकजण आता करू लागल्याने शेजारच्‍यांना याचे दु:ख होत असल्याची टिका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

राहाता बाजार समिती निवडणूकीच्‍या निमित्ताने साकुरी गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी खा. विखे पाटील बोलत होते. ना. विखे पाटील यांच्‍या रुपाने मिळालेले मंत्रीपद आपल्याला नवे नाही. मंत्रीपद असो असावा नसो समाजासाठी काम करण्‍याची भूमिका ही त्‍यांची कायम आहे. मात्र जे मलई खातात त्यांना महसुलमंत्रीपद मोठे वाटते. राज्यातील महसुल विभागातील १४० प्रांत, १५० तहसिलदारांच्या बदल्यांमध्‍ये कोणी तक्रार करु शकले नाही.

आज अनेकजणं या तालुक्‍यात येवून येथील सहकारी संस्‍थांना दृष्‍ट लावण्‍याचे काम करीत आहेत. मंत्री असताना त्‍यांना पिंपळस, दहेगांव आठवले नाही त्यांना जे करायचे ते करुद्या, तुम्ही कार्यकर्त्ये आमची ताकद आहात. असे स्‍पष्‍ट करुन डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, आम्‍ही वाळुतस्कारांना आपण पोसत नाही. १० ठेकेदार कार्यकर्त्यांना सांभाळण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी ६०० रुपये ब्रासने वाळू उपलब्‍ध करुन माफीयागिरीला मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी हद्दपार केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आपली संघटना ही कार्यकर्त्यांची आहे. संघटनेत प्रत्‍येक कार्यकर्ता हा तोलामोलाचा आहे. कुणाला उमेदवारी असो अथवा नसो, सर्वांना सन्मानच असतो. बाजार समितीची निवडणूक ही फक्‍त आता औपचारिकता राहीली आहे. मागील ५ वर्षांत बाजार समितीतून शेतक-यांना न्‍याय देण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न झाला आहे. आपल्‍या बाजार समितीने राज्‍यात आदर्श निर्माण करुन वेगळेपण जपले आहे. कोव्‍हीड संकटातही शेतक-यांना दिलासा देण्‍याची भूमिका घेतली गेली. मात्र मागील आघाडी सरकारमध्‍ये ज्‍यांच्‍यावर जबाबदारी होती त्‍यांनी त्‍यांच्‍या बाजार समित्‍या बंद ठेवून शेतक-यांना देशोधडीला लावले तेच आता आम्‍हाला येवून शहानपणा शिकवित आहेत अशी टिकात्‍यांनी केली.

खडकेवाके येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उभारण्‍यात येणा-या १० कोटीचा प्रकल्पास मंजुरी मिळाली असल्याचे सांगत खासदार डॉ. विखे म्हणाले की, या प्रकल्‍पात शेळ्या, मेंढ्या यांचे लोकर, ब्रिडींग, मांस निर्यात, उपपदार्थ निर्मिती तेथे होणार आहे. येत्या १५ दिवसात त्याचे भुमिपूजन होणार असून, या प्रकल्पातुन २०० ते ३०० तरुणांना नोकरी मिळू शकेल. यासाठी तरुणांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, राहत्याचे माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांची भाषणे झाली.

याप्रसंगी गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे, संचालक विजयराव गोर्डे, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर, भाजपाचे शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, गंगाधर बोठे, नंदकुमार गव्हाणे, विरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, दिपकराव रोहोम, नानासाहेब बोठे, वाल्मिकराव गोर्डे, सुरेश गाडेकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, भारत लोखंडे, सचिन मुरादे, संदिप दंडवते, अ‍ॅड. रविंद्र बोरकर, गोटु सदाफळ, प्रा. बाळासाहेब गाडेकर, ज्ञानेश्‍वर सदाफळ, गंगाधर बोठे, हेमंत गोर्डे, प्रकाश पुंड यांचेसह साकुरी, अस्तगाव, खडकेवाके, पिंपळस, दहेगाव, तसेच अन्यभागातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.